१० मिनिटांमध्ये झटपट बनवा विकत मिळते तशी आंबटगोड खजूर चटणी
जेवणात तोंडी लावण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पदार्थांपासून चटण्या बनवल्या जातात, खोबऱ्याची चटणी, लसूण चटणी, आल्याची चटणी, शेंगदाणा चटणी, ओल्या खोबऱ्याची चटणी इत्यादी अनेक प्रकारच्या चटण्या कायमच घरी बनवल्या जातात. विकतचा सामोसा किंवा वडापाव आणल्यानंतर त्यासोबतच चटणीसुद्धा दिली जाते. त्यामुळे खजूर चटणी सगळ्यांचं खूप जास्त आवडते. आंबटगोड चवीची चमचमीत चटणी सगळेच आवडीने खातात. मात्र घरी बनवलेल्या चटणीला हॉटेलसारखी चव लागत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये खजूर चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. खजूर खाणे शरीरासाठी पौष्टीक मानले जाते. थंडीच्या दिवसांमध्ये नियमित २ खजूर खाल्ल्यास उष्णता कायम टिकून राहण्यासोबतच शरीराला भरमसाट फायदे होतील. खजूर चटणी दोन ते तीन आठवडे व्यवस्थित टिकून राहते. फ्रिजमध्ये ठेवलेली चटणी जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहते. चला तर जाणून घेऊया आंबटगोड खजूर चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
One Pot Recipe: १० मिनिटांत कुकरमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल पावभाजी, सकाळचा नाश्ता होईल आणखीनच मजेदार






