नाश्त्यासाठी बनवा नाचणीच्या पिठाचा जाळीदार चिला
सकाळी उठल्यानंतर काहींना ऑफिसला जायची घाई तर लहान मुलांना शाळेत जाण्याची घाई असते. अनेकदा सकाळच्या वेळी नाश्त्यामध्ये नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी अनेकदा बाहेरून विकतचा नाश्ता आणला जातो. पण सतत बाहेरचे पदार्थ खाल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना आणि घरातील इतरांना बाहेरील पदार्थ खायला देण्यापेक्षा घरातील पदार्थ द्यावेत. आज आम्ही तुम्हाला नाश्त्यात बनवण्यासाठी नाचणीचे चिला कसा बनवावा, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नाचणी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. नाचणीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. नाचणीच्या पिठापासूनन बनवलेले पदार्थ खाल्यास शरीरात ऊर्जा वाढून अशक्तपणा दूर होईल. चला तर जाणून घेऊया नाचणी चिला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: ‘या’ 6 सुपरफूड्समुळे राहील Lungs उत्तम आणि शरीर भरभक्कम, आजच करा आहारात समाविष्ट