फोटो सौजन्य: iStock
शरीरात असे खूप महत्वाचे अवयव असतात जे उत्तम असेल तरच आपले शरीर निरोगी राहते. यातीलच एक अवयव म्हणजे फुफ्फुस. फुफ्फुस हे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव असतात, जे श्वास घेण्याच्या प्रक्रियेत मोठी भूमिका बजावतात. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी फुफ्फुसे निरोगी असणे खूप महत्वाचे आहे.
हल्ली बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकदा लोकं त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. फुफ्फुसामुळेच शरीरातील सर्व पेशींना ऑक्सिजन मिळते ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीराची सर्व कार्य योग्य प्रकारे चालतात. याशिवाय फुफ्फुसे आपल्या शरीरात इतरही अनेक कार्ये करतात, त्यामुळे त्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. मात्र, वाढते वायू प्रदूषण आणि धुम्रपान यामुळे फुफ्फुसाच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत, फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच आज आपण या 6 सुपरफूड्सबद्दल जाणून घेऊया जे फुफ्फुसांचे आरोग्य चांगले ठेवते.
हे देखील वाचा: टेस्टोस्टेरॉनची पातळी झालीये कमी, त्वरीत ओळखा संकेत अन्यथा होऊ शकणार नाही ‘बाप’
हळदीमध्ये कर्क्यूमिन आढळते, ज्यामुळे ते दाहक-विरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते. यामुळे फुफ्फुसाची जळजळ कमी होते आणि फुफ्फुस डिटॉक्स होण्यास मदत होते. हळदीचे दूध, चहा किंवा फक्त हळदीचे पाणी फुफ्फुसांना डिटॉक्स करण्यास सक्षम आहे.
मधाच्या दाहक-विरोधी आणि अँटी-बॅक्टेरियल प्रभावामुळे, मध फुफ्फुसांवर हल्ला करणाऱ्या मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास सक्षम आहे. त्यामुळे सकाळी मध आणि लिंबू पाणी पिणे फुफ्फुसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
बीटरूटमध्ये नायट्रेट आणि इतर पोषक घटक आढळतात, ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये रक्त प्रवाह वाढतो आणि ऑक्सिजन पोहोचण्यास मदत होते. हे फुफ्फुसाच्या डिटॉक्समध्ये मदत करते. तसेच बीटरूट सॅलड किंवा ज्यूस पिण्याचे अनेक फायदे आहेत.
हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि जळजळ कमी करते, ज्यामुळे फुफ्फुसांचे डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी ते खूप फायदेशीर आहे. तसेच यामुळे CPOD सारख्या समस्या दूर होतात.
अननस फुफ्फुसातील म्यूकस विरघळण्यास मदत करते. त्यात ब्रोमेलेन नावाचे एंजाइम आढळते, जे एक मजबूत दाहक एजंट आहे. अननसाचा रस एक उत्कृष्ट खोकला शमन करणारा आहे.
टोमॅटोमध्ये लाइकोपीन आढळते, ज्यामुळे फुफ्फुसाची जळजळ कमी होते. तसेच दमा आणि सीओपीडीचा धोका देखील कमी होतो. त्यामुळे टोमॅटोचा आहारात समावेश करा.