विड्याच्या पानांपासून या पद्धतीने घरीच बनवा अस्सल शाही मुखवास, पदार्थ खाऊन घरातील सगळेच करतील कौतुक
Paan Mukhwas Recipe: जेवण झाल्यानंतर अजूनही बऱ्याच घरांमध्ये आजीआजोबा पान किंवा मुखवास खातात. पान खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. लग्नसमारंभ किंवा हॉटेलमध्ये जेवणानंतर आवडीने मुखवास खाल्ले जाते. बडीशेप आणि इतर विविध पदार्थांचा वापर करून बनवलेले मुखवास चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अस्सल शाही मुखवास बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला मुखवास ३ ते ४ दिवस सहज टिकून राहतो. याशिवाय कमीत कमी साहित्यात बनवलेला मुखवास घरातील प्रत्येक व्यक्ती अतिशय आवडीने खाईल. सुपारी टाकून विड्याची पाने खाण्याऐवजी या पद्धतीने मुखवास बनवून खावा. चला तर जाणून घेऊया शाही मुखवास बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






