
लिंबाच्या साली फेकून देत असाल तर थांबा! घरच्या घरी बनवा सुगंधी चटपटीत लिंबाच्या सालींचा मसाला
Lemon Peel Masala: जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि पदार्थ पचन होण्यासाठी जेवणात लिंबाचा रस मिक्स केला जातो. यामुळे पदार्थाला चटपटीत चव लागते आणि खाल्लेले अन्नपदार्थ सुद्धा पचन होण्यास मदत होते. कोशिंबीर, चाट, सॅलड बनवल्यानंतर आवर्जून त्यावर लिंबाचा रस टाकला जातो. लिंबाचा रस काढून झाल्यानंतर साली फेकून दिल्या जातात. पण लिंबाच्या साली फेकून देण्याऐवजी त्यापासून सोप्या पद्धतीमध्ये मसाला तयार करू शकता. लिंबाच्या सालींपासून बनवलेला मसाला चिकन, फिश मॅरिनेशनसोबतच पॉपकॉर्न, फ्रेंच फ्राईज आणि स्नॅक्स इत्यादी पदार्थांवर टाकून खाऊ शकता. यामुळे पदार्थाची चव चटपटीत आणि मस्त लागेल. बाजारातून कायमच विकतचे मसाले आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेला चटपटीत मसाला सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. योग्य पद्धतीने मसाला बनवल्यास महिनाभर व्यवस्थित टिकून राहतो. चला तर जाणून घेऊया लिंबाच्या सालींचा मसाला बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – AI)