शरीरातील ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी दुपारच्या जेवणात प्या थंडगार काकडीचे ताक, पोटातील जळजळ होईल कमी
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर घरात वेगवेगळे थंड पदार्थ आणून बनवले जातात. त्यात सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे काकडी. डाएटमध्ये काकडी नुसतीच खाल्ली जाते. काकडी खाल्ल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते, कारण काकडीमध्ये ९० टक्के पाणी आढळून येते. जेवणानंतर सगळ्यांचं ताक पिण्याची सवय असते. दुपारच्या जेवणानंतर ताक प्यायल्यास खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास होते. काकडी खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन कमी होण्यास मदत, त्वचेचे आरोग्य सुधारते इत्यादी भरमसाट फायदे शरीराला होतात. त्यामुळे नियमित एक काकडी खावी. आज आम्ही तुम्हाला काकडीचे ताक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. याआधी तुम्ही मसाला ताक किंवा नुसतेच ताक प्यायले असेल, पण काकडीचे ताक नक्कीच घरी एकदा तरी बनवून पहा. चला तर जाणून घेऊया काकडीचे ताक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
कडक उन्हाळ्यात शरीराला मिळेल गारवा! झटपट घरी बनवा आंबटगोड कैरीचे पन्ह, नोट करून घ्या रेसिपी






