
दोडक्याची साल फेकून देता? मग पारंपरिक पद्धतीने घरी बनवा सालींची सुकी चटणी
प्रत्येक स्वयंपाक घरात दररोज वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात. कोबी, पालक, भेंडी, भोपळा इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांपासून नवनवीन रेसिपी बनवल्या जातात. भाज्यांमध्ये असलेल्या बिया आणि भाज्यांची साल बऱ्याचदा फेकून दिली जाते. पण यामध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात. घरात दोडक्याची भाजी आणल्यानंतर भाजीवरील साल काढून फेकून दिली जाते. पण याच सालींचा वापर करून तुम्ही नवीन रेसिपी बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला दोडक्याच्या सालींची सुकी चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. याशिवाय दोडक्याच्या सालींची चटणी तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. दोडक्याच्या सालींची चटणी आठवडाभर व्यवस्थित टिकून राहते लहान मुलांना दोडक्याची भाजी खायला आवडत नाही. त्यामुळे मुलांना तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी बनवून खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया दोडक्याच्यासालींची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)