
जेवणाला येईल चटकदार चव! रात्रीच्या जेवणासाठी पारंपरिक सारस्वत स्टाइलने बनवा आंबट बटाटा
रात्रीच्या जेवणात कायमच डाळभात, भाजी, चपाती इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. आपल्यातील अनेकांना जेवणाच्या ताटात चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये सारस्वत स्टाइलने आंबट बटाट्याची भाजी बनवू शकता. लहान मुलांना बटाट्याची भाजी खायला खूप जास्त आवडते. बटाट्याच्या काचऱ्या, बटाट्याची तिखट भाजी, बटाट्याची रस्सा भाजी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. सारस्वत स्टाईल आंबट बटाटा भाजी तुम्ही कोणत्याही पदार्थसोबत खाऊ शकता. गरमागरम वाफाळता भात, चपाती किंवा भाकरीसोबत आंबट बटाटा अतिशय चविष्ट लागतो. तुम्ही बनवलेली आंबट बटाटा भाजी घरातील प्रत्येकालाच खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया आंबट बटाटा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
दोडक्याची साल फेकून देता? मग पारंपरिक पद्धतीने घरी बनवा सालींची सुकी चटणी, नोट करून घ्या रेसिपी