सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊ-मोकळा शेवयांचा उपमा
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? बऱ्याचदा सुचत नाही. कायमच नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये शेवयांचा उपमा बनवू शकता. शेवयांपासून प्रामुख्याने गोड पदार्थ बनवला जातो, असे अनेकांना वाटते. पण त्याच शेवयांपासून तुम्ही तिखट उपमा सुद्धा बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. तुम्ही बनवलेला शेवयांचा उपमा घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. रव्यापासून सुद्धा उपमा किंवा सांजा बनवला जातो. सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्यास प्रत्येकालाच हवे असतात. सकाळी पोटभर नाश्ता केल्यामुळे दिवससुद्धा आनंद आणि उत्साहामध्ये जातो. याशिवाय लवकर भूक लागत नाही. लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही शेवयांचा उपमा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया शेवयांचा उपमा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
पितृपक्षात नैवेद्यासाठी झटपट बनवा आंबट गोड आमसुलाची चटणी, चवीसोबत आरोग्यासाठी ठरेल गुणकारी