दसऱ्यानिमित्त घरी बनवा चमचमीत शाही व्हेज पुलाव!
नवरात्रीच्या दहाव्या दिवशी सगळीकडे दसरा सण साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते. याशिवाय घरात सरस्वतीपूजन आणि आपट्याच्या पानांची पूजा करून गोड नैवैद्य बनवला जातो. दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी घरात असंख्य पाहुणे येतात. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी काहींना काही खास रेसिपी बनवून पाहुण्यांचे स्वागत केले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चवचमीत शाही व्हेज पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वेगवेगळ्या भाज्या, मसाले आणि तांदळाचा वापर करून बनवलेला चमचमीत पुलाव घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. पुलावचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. याशिवाय घाईगडबडीच्या वेळी सुद्धा नेमकं काय बनवावं सुचत नसेल तर तुम्ही व्हेज पुलाव बनवू शकता. जाणून घ्या व्हेज पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
तेच तेच बोरिंग पदार्थ खाणं सोडा, नवरात्रीच्या उपवासात घरी बनवा साबुदाण्याची लुसलुशीत पुरी
दसऱ्यानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा चवदार सफरचंदाची खीर, नोट करून घ्या रेसिपी