भाकरी किंवा भातासोबत खाण्यासाठी गावरान पद्धतीमध्ये बनवा शेवग्याच्या शेंगांचं पिठलं
शेवग्याच्या शेंगा खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, कंबर दुखी किंवा आरोग्यासंबंधित सर्वच समस्यांवर शेवग्याच्या शेंगा गुणकारी ठरतात. तसेच शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी शेवग्याच्या पावडरचे कोमट पाण्यातून सेवन केले जाते. यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारते आणि पोटात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. शेवग्याच्या शेंगांचा वापर करून भाजी, आमटी किंवा रस्सा बनवला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला भाकरीसोबत खाण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचे पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात पिठलं हा पदार्थ अतिशय फेमस आहे. तांदळाची किंवा इतर कोणत्याही भाकरीसोबत तुम्ही शेवग्याचं पिठलं खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये शेवग्याच्या शेंगांचे पिठलं बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – istock)
घरच्या घरी बनवा हॉटेल सारखे टेस्टी आणि सॉफ्ट Chicken Seekh Kebab; चवीला मजेदार, विकेंडसाठी परफेक्ट
पावसाळ्यात दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा गरमागरम कढीगोळे, नोट करून घ्या सोपी रेसिपी