नवरात्रीच्या उपवासात सकाळच्या नाश्त्यात बनवा शिंगाडा पुरी
शारदीय नवरात्री उत्सवाला राज्यभरात सगळीकडे सुरुवात झाली आहे. या दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. तसेच दररोज नवनवीन पदार्थांचा नैवेद्या दाखवला जातो. या दिवसांमध्ये मनोभावे उपवास केल्यानंतर देवी प्रसन्न होते, अशी मान्यता आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये नऊ दिवस केलेला उपवास आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. नवरात्रीच्या उपवासात रोज नाश्त्यासाठी नेमकं काय खावं? असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी तुम्ही शिंगाडा पुरी बनवू शकता. शिंगाडा आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. शिंगाडा पुरी बनवण्यासाठी अतिशय सोपी आहे. कमीत कमी वेळात तयार होणारा पदार्थ सर्वच महिलांना बनवायला आवडतो. चला तर जाणून घेऊया शिंगाडा पुरी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: नवरात्रीच्या उपवासात दुपारच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबूदाणा रोल्स, वाचा सिंपल रेसिपी