
वयाच्या ५० व्या वर्षी स्मृती इराणींनी केले तब्बल 27 किलो वजन कमी! 'या' साध्या टिप्स फॉलो करून राहाल कायमच फिट आणि तरुण
वजन कमी करण्यासाठी स्मृती इराणींनी घेतलेला डाएट?
स्मृती इराणी यांच्या फिटनेसचे रहस्य?
वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
स्मृती इराणी यांनी अभिनय क्षेत्रापासून ते राजकारण, सोशल मीडियापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतील तुलसी विरानी यांची भूमिका मोठ्या प्रमाणावर गाजली. त्यांनी त्यांच्या अभिनयामुळे कोट्यवधी रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मध्यंतरी त्यांचे वजन खूप जास्त वाढले होते. पण अथक प्रयत्न आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा त्यांचे वजन कमी केले. वयाच्या ५० व्या वर्षी स्मृती इराणी अतिशय तरुण आणि फिट दिसतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्मृती इराणी त्यांच्या फिटनेससाठी कोणता आहार आणि व्यायाम नियमित फॉलो केला, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हा व्यायाम आणि आहार फॉलो करून तुम्ही वाढलेले वजन झपाट्याने कमी करू शकता.(फोटो सौजन्य – pinterest)
स्मृती इराणी दिवसाची सुरुवात अतिशय हलक्या आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांनी करतात. साधा आणि सहज पचन होणारा आहार घेतल्यास शरीराला तात्काळ ऊर्जा मिळेल आणि पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होईल. स्मृती इराणी दिवसाची सुरुवात कोमट पाण्याचे सेवन करून करतात. कोमट पाण्याच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर डिटॉक्स होते. त्यानंतर त्या गाजर आणि सफरचंद ज्यूस पितात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच नाश्त्यात प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास शरीर हेल्दी राहील.
भारतीय आहारात दुपारच्या जेवणात कायमच कार्ब्स जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन केले जातात. मात्र कार्ब्स युक्त पदार्थांचे करण्याऐवजी पौष्टिकतेवर भर द्यावे. त्यामुळे दुपारच्या जेवणात पालेभाज्या, डाळ आणि चपाती एवढेच पदार्थ खावेत. भात अजिबात खाऊ नये. भातामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे दुपारच्या जेवणात ब्राऊन राईस खावा. याशिवाय पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी वाटीभर दह्याचे सेवन करावे.
दिवसभर काम करून थकल्यानंतर प्रत्येकालाच काहींना काही खाण्याची इच्छा होते किंवा भूक लागते. भूक लागल्यानंतर कोणताही तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी सुका मेवा किंवा ताज्या फळांचे सेवन करावे. तसेच दिवसभराचा वाढलेला थकवा दूर करण्यासाठी ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफीचे सेवन करावे.
रात्रीच्या जेवणात कायमच सहज पचन होणाऱ्या आणि अतिशय हलक्या पदार्थांचे सेवन करावे. जेवणात हेल्दी सूप, स्टीम केलेल्या भाज्या किंवा मासे आणि चपाती खाण्यास जास्त प्राधान्य द्यावे. तसेच झोपण्याआधी कोणतेही एक फळ खाऊन झोपावे. यामुळे शांत झोप लागते.
Ans: फळे, भाज्या, पातळ प्रथिने (lean proteins) आणि संपूर्ण धान्याचा समावेश करा. साखर आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा.
Ans: आठवड्यातून बहुतेक दिवस किमान ३० मिनिटे एरोबिक व्यायाम (चालणे, धावणे, पोहणे) करा. आठवड्यातून दोनदा स्ट्रेंथ ट्रेनिंग (वजन उचलणे, पुशअप्स) करा.
Ans: रोजच्या कॅलरी सेवनातून ५००-८०० कॅलरीज कमी करा, जेणेकरून कॅलरीची तूट (calorie deficit) निर्माण होईल. तुम्ही खाल्लेल्या पदार्थांचा मागोवा (track) ठेवू शकता.