दुपारच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा मसालेदार आवळ्याची चटणी
हिवाळ्यामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर आवळे उपलब्ध असतात. आवळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये विटामिन सी आणि अँटीअँक्सीडेंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे त्वचेसह केसांनासुद्धा अनेक फायदे होतात. आवळ्याचे सेवन केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते. याशिवाय आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होईल. आवळ्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आवळ्याची चटणी, मुरंबा, आवळा कँडी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दुपारच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी आवळ्याची झणझणीत चटणी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही चटणी तुम्ही चपाती, भाकरी इत्यादी पदार्थांसोबत खाऊ शकता.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा
नवनवीन बातम्यांसाठी इथे क्लिक करा