
रविवार होईल आणखीनच स्पेशल! रात्रीच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत बनवा झणझणीत मालवणी चिकन सुक्का
सुट्टीच्या दिवशी जेवणात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवा असतो. जगभरात असंख्य नॉनव्हेज प्रेमी आहे. चिकन, मटण आणि मासे खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. रविवारी प्रत्येक घरात चिकन किंवा माशांचा बेत आखला जातो. याशिवाय काहींना जेवणात जर नॉनव्हेज नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या जेवणासाठी झणझणीत मालवणी पद्धतीमध्ये चिकन सुक्का बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कोकणातील प्रत्येक घरात ओल्या खोबऱ्याचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. ओल्या खोबऱ्याशिवाय जेवणाला सुंदर चव लागत नाही. चिकन सुक्का हा पदार्थ तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा वाफाळत्या भातासोबत सुद्धा खाऊ शकता. जेवणात जर चिकन असेल तर चार घास जास्त जातात. हॉटेलमध्ये बाहेर गेल्यानंतर बऱ्याचदा चिकनचे अनेक वेगवेगळे पदार्थ मागवले जातात. पण सतत बाहेरील चिकन किंवा नॉनव्हेज पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले अन्नपदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया मालवणी चिकन सुक्का बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
कुकरमध्ये १० मिनिटांमध्ये बनवा झटपट इटालियन मॅकरोनी पास्ता! एका शिट्टीत तयार होईल चमचमीत पदार्थ