कुकरमध्ये १० मिनिटांमध्ये बनवा झटपट इटालियन मॅकरोनी पास्ता!
सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं हा प्रश्न सगळ्यांचं कायमच पडतो. कांदापोहे, उपमा, शिरा, इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही १० मिनिटात कुकरमध्ये इटालियन मॅकरोनी पास्ता बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पास्ता खायला खूप जास्त आवडतो. पास्ताचे नाव ऐकल्यानंतर मुलांच्या तोंडाला पाणी सुटते. हॉटेलमध्ये बाहेर गेल्यानंतर अतिशय आवडीने पास्ता मागवला जातो. पण घरात पास्ता बनवायचा म्हंटला की खूप जास्त कंटाळा येतो. कारण सगळ्यात आधी पास्ता शिजवा, त्यानंतर त्याचा सॉस तयार करा आणि नंतर तयार केलेल्या पास्त्याला फोडणी दिली जाते. यामध्ये खूप जास्त वेळ जातो. घाईच्या दिवशी पास्ता बनवणे बऱ्याचदा शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही कुकरचा वापर करून वन पॉट पास्ता शिजवू शकता. चला तर जाणून घेऊया इटालियन मॅकरोनी पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)






