पावसाळ्यात मसालेदार आणि कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा Spring Roll
राज्यभरात सगळीकडे जोरदार पाऊस पडत आहे. पाऊस पडल्यानंतर सगळीकडे थंड वातावरण असते. थंड वातावरणात सगळ्यांचं भजी किंवा कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. कायमच कांदाभजी, बटाटाभजी किंवा इतर वेगवेगळ्या पदार्थांच्या भजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन हटके पदार्थ सकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं हवे असतात. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये स्प्रिंग रोल बनवू शकता. हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्टार्टर म्हणून स्प्रिंग रोल आवडीने खाल्ले जातात. घाईगडबडीच्या वेळी किंवा कुठेही बाहेर फिरायला जाताना तुम्ही स्प्रिंग रोल बनवून नेऊ शकता. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर काहींना काही चमचमीत किंवा मसालेदार पदार्थ हवा असेल तर तुम्ही स्प्रिंग रोल बनवू शकता. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये स्प्रिंग रोल बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
वाटीभर पनीरपासून १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रसमलाई मोदक! नोट करून घ्या मोदक बनवण्याची सोपी रेसिपी