Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुरकुरीत आणि चटकदार… घरी बनवा मार्केट स्टाईल ‘मसाला शेंगदाणा’, 10 मिनिटांची रेसिपी

Masala Peanuts Recipe : कुरकुरीत चवीचे मसाला शेंगदाणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे आहेत. पार्टी स्नॅक्ससाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही त्यांना घरीच बनवून ठेवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 29, 2026 | 03:30 PM
कुरकुरीत आणि चटकदार... घरी बनवा मार्केट स्टाईल 'मसाला शेंगदाणा', 10 मिनिटांची रेसिपी

कुरकुरीत आणि चटकदार... घरी बनवा मार्केट स्टाईल 'मसाला शेंगदाणा', 10 मिनिटांची रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • कुरकुरीत आणि झणझणीत चवीचे मसाला शेंगदाणे तर सर्वांच्या आवडीचे आहेत.
  • हे मसाले शेंगदाणे नेहमीच बाजारातून विकत घेऊन खाल्ले जातात.
  • पण तुम्हाला माहिती आहे का? अवघ्या काही मिनिटांतच निवडक साहित्यांपासून तुम्ही त्यांना घरीच तयार करू शकता.
घरच्या घरी बनवलेला मसाला शेंगदाणा हा चटकदार, कुरकुरीत आणि सगळ्यांचा आवडता असा स्नॅक आहे. चहा-कॉफीबरोबर, प्रवासात खायला किंवा उपवासानंतर हलका नाश्ता म्हणून मसाला शेंगदाणा खूपच परफेक्ट लागतो. बाजारात मिळणाऱ्या शेंगदाण्यांपेक्षा घरचा बनवलेला मसाला शेंगदाणा जास्त स्वच्छ, ताज्या तेलात आणि आपल्या आवडीनुसार मसाले घालून बनवता येतो, हीच त्याची खासियत आहे.

मेंदू तल्लख करेल, हाडेही होतील मजबूत… रोज चमचाभर खा डिंकाचा पाक; नोट करा रेसिपी

शेंगदाणे हे प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्सने भरलेले असल्यामुळे ते आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. योग्य प्रमाणात खाल्ल्यास ते ऊर्जा देतात आणि पोटही बराच वेळ भरलेले ठेवतात. थोडी तिखट-चटपटीत चव, कुरकुरीत पोत आणि मसाल्यांचा सुगंध यामुळे मसाला शेंगदाणा एकदा खायला लागला की थांबावंसं वाटत नाही. सणासुदीला पाहुण्यांसाठी, लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा संध्याकाळच्या गप्पांसोबत हा पदार्थ हमखास ठेवला जातो. चला तर मग, अगदी सोप्या पद्धतीने घरीच खमंग मसाला शेंगदाणा कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

 साहित्य:

  • कच्चे शेंगदाणे – 2 कप
  • बेसन – 3 ते 4 टेबलस्पून
  • तांदूळ पीठ – 1 टेबलस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून (चवीनुसार)
  • हळद – ½ टीस्पून
  • धणे-जिरे पूड – 1 टीस्पून
  • आमचूर पावडर / चिंचेची पावडर – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • ओवा – ½ टीस्पून
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • तेल – तळण्यासाठी
शेफ कुणाल कपूर स्पेशल रेसिपी! नाश्त्यासाठी बनवा सुपर हेल्दी पालक पनीर डोसा, खोबऱ्याच्या चटणीसोबत घ्या आनंद

 कृती:

  • यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात कच्चे शेंगदाणे घ्या आणि त्यात बेसन, तांदूळ पीठ घाला.
  • त्यात लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, आमचूर पावडर, ओवा आणि मीठ घालून सर्व साहित्य नीट मिसळा.
  • थोडेथोडे पाणी घालून घट्टसर पीठ तयार करा, जेणेकरून मसाला शेंगदाण्यांना नीट चिकटेल.
  • कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाले की शेंगदाणे थोडेथोडे करून टाका.
  • मध्यम आचेवर सतत हलवत शेंगदाणे सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • तळलेले शेंगदाणे कागदावर काढून अतिरिक्त तेल निथळू द्या.
  • पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
  • अधिक खमंग चवीसाठी थोडी चाट मसाला पावडर वरून भुरभुरू शकता.
  • हे शेंगदाणे 8–10 दिवस सहज टिकतात.
  • कमी तेलात बनवण्यासाठी एअर फ्रायरमध्येही करता येतात.

Web Title: Crispy and tasty make market style masala peanuts in just 10 minutes recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
1

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा
2

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
3

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव
4

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम मिक्स व्हेज कटलेट, हिरव्या चटणीसोबत लागेल भारी चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.