Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाश्त्यामध्ये बनवा मिश्र कडधान्यांचा ढोकळा, चवीसोबत आरोग्याला होतील फायदे

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी नाश्त्यामध्ये मिश्र कडधान्यांचा ढोकळा बनवून खावा. हा ढोकळा आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. शिवाय या पदार्थाचे सेवन केल्यास पोटही दीर्घकाळ भरलेले राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 06, 2024 | 12:30 PM
सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मिश्र कडधान्यांचा ढोकळा

सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मिश्र कडधान्यांचा ढोकळा

Follow Us
Follow Us:

जगभरात मधुमेह या गंभीर आजाराने त्रस्त असलेले अनेक रुग्ण आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढत जाते आणि आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवतात. मधुमेह झाल्यानंतर कायमचे गोळ्या औषधांवर जीवन काढावे लागते. अशी गंभीर परिस्थिती येऊ नये आधीच आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन जीवन जगणे. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणाऱ्या बदलांमुळे आणि चुकीची जीवनशैली जगल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी पौष्टिक आणि शरीराला पचन होईल अशा अन्नपदार्थांचे सेवन करावे. हल्लीच्या तरुण पिढीलासुद्धा मधुमेहासारख्या गंभीर आजार होत आहे.

मधुमेह झाल्यानंतर जेवणातील पदार्थांमध्ये पथ्य पाळावे लागते. मधुमेहाचे रुग्ण जास्त प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन करू शकत नाहीत. असे केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नाश्त्यामध्ये किंवा इतर वेळी नेमकं काय खावं? असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्ही नाश्ता मिश्र कडधान्यांपासून ढोकळा बनवू शकता. हा ढोकळा बनवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. मिश्र कडधान्यांच्या ढोकळ्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला सुद्धा फायदे होतात.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: हळदीचे दूध पिण्याची योग्य वेळ

साहित्य:

  • मोड आलेले मूग
  • पालक
  • हिरवी मिरची
  • बेसन
  • मीठ
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • हिंग
  • फ्रूट सॉल्ट
  • तेल
हे देखील वाचा: Recipe: हॉटेलसारखी परफेक्ट पावभाजी घरी कशी बनवावी? जाणून घ्या सोपी पद्धत

कृती:

  • मिश्र कडधान्यांचा ढोकळा बनवण्यासाठी मोड आलेले मूग स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर साफ करा.
  • मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मूग, बारीक चिरलेला पालक, हिरव्या मिरच्या टाकून बारीक पेस्ट तयार करा.
  • त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणात मीठ आणि बेसन टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर त्यात फ्रूट सॉल्ट टाका.
  • ढोकळा बनवण्यासाठी ताटाला थोडंसं तेल लावून व्यवस्थित पसरवून घ्या. त्यानंतर त्यात तयार पीठ ओतून व्यवस्थित सगळीकडे पसरवा.
  • कुकरची शिट्टी काढून ढोकळा बनवण्यासाठी 10 ते 15 मिनिटं ठेवून व्यवस्थित शिजवून घ्या.
  • फोडणीच्या भांड्यात तेल गरम गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता टाकून फोडणी भाजून घ्या.
  • तयार केलेली फोडणी ढोकळ्यावर ओतून सुरीच्या साहाय्याने तुकडे करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मिश्र कडधान्यांचा ढोकळा.

Web Title: How to make sprouts and spinach dhokla at home healthy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 12:30 PM

Topics:  

  • Diabetics
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Fatty Liver: ना वजन जास्त, ना मधुमेह… तरीही फॅटी लिव्हर का होतो? जाणून घ्या खरं कारण
1

Fatty Liver: ना वजन जास्त, ना मधुमेह… तरीही फॅटी लिव्हर का होतो? जाणून घ्या खरं कारण

पावसाळ्यात करा गरमागरम बेत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी
2

पावसाळ्यात करा गरमागरम बेत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
3

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
4

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.