सकाळच्या नाश्त्यात करा स्ट्रॉबेरी स्मूदीचे सेवन
वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर आरोग्य आणखीनच बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींवर कंट्रोल ठेवणे आवश्यक आहे. सतत बाहेरच्या तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक महिला तासनतास जिम करणे, प्रोटीन शेक, डाईट फॉलो करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र चुकीच्या पद्धतीने डाईट फॉलो केल्यास आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात स्मूदीचे सेवन करावे. स्मूदी प्यायल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात स्ट्रॉबेरी उपलब्ध असतात. स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. विटामिन सी युक्त स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. दैनंदिन आहारात जंक फूडचे सेवन करण्याऐवजी स्मूदी किंवा इतर पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील. आज आम्ही तुम्हाला स्ट्रॉबेरी स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यामुळे तुमचं वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होईल.
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा