
दत्तजयंतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने नैवेद्यासाठी घरी बनवा सुंठवडा
दरवर्षी दत्तजयंती मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केली जाते. हिंदू पंचागात येणाऱ्या मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तजयंती असते. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित रूप मानले जातात.त्यांच्या जयंतीच्या दिवशी केलेल्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की दत्त जयंतीला पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.दत्त गुरूंकडे अनिष्ट शक्तींचा नाश करण्याची शक्ती होती, म्हणून त्यांना कठीण काळात तारक अवतार मानले जाते. दत्तजयंतीच्या दिवशी घरात वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य बनवला जातो. त्यात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे सुंठवडा. सुंठ आणि इतर पदार्थांचा वापर करून बनवला जाणारा पौष्टिक पदार्थ देवाच्या नैवेद्यासाठी बनवला जातो. सुंठवडा चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. चला तर आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असल्लेया सुंठवडा बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)