उपवासाच्या दिवशी झटपट बनवा चविष्ट राजगिऱ्याची खीर
संपूर्ण देशभरात आषाढी एकादशी साजरा केली जाते. यादिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मोठा उत्साह आणि आनंद असतो. विठ्ठलाची मनोभावे पूजा केली जाते. तसेच अनेक घरांमध्ये एकादशीच्या दिवशी उपवास केला जातो. उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी, वरीचा भात किंवा साबुदाणा वडा बनवून खाल्ला जातो. मात्र रिकाम्या पोटी साबुदाणे खाल्यास ऍसिडिटी किंवा पित्ताची समस्या उद्भवू शकते. साबुदाणे पचायला अतिशय जड असतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी नेहमीच पचनास हलके असलेले पदार्थ खावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उपवासाच्या दिवशी राजगिऱ्याची खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागते. याशिवाय राजगिरा खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. राजगिरा खाल्ल्यामुळे रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. चला तर जाणून घेऊया राजगिऱ्याची खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
पिकलेली खायला आवडत नाहीत? मग सोप्या पद्धतीमध्ये साखरेचा वापर न करता बनवा चविष्ट हाय प्रोटीन वडी
सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा प्रथिनेयुक्त काळ्या चण्यांचे कटलेट; लगेच नोट करा रेसिपी