सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या!
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. याशिवाय महिलांसह पुरुषसुद्धा उपवास करतात. देवीची घटस्थापना झाल्यानंतर नऊ दिवस घरात वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जातात. याशिवाय उपवासाचे काही ठराविक पदार्थ बनवून नाश्ता आणि संध्याकाळचा आहार घेतला जातो. उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणे खाल्ले जातात. पण वारंवार साबुदाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. उपवासाच्या दिवशी उपाशी पोटी साबुदाणे खाल्यामुळे शरीरात पित्ताचे प्रमाण वाढू लागते. शरीरात वाढलेल्या पित्तामुळे अपचन, गॅस किंवा उलट्या मळमळ होते. ही समस्या उद्भवू नये म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये राजगिरा रताळ्याची पुरी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बटाट्याच्या भाजीसोबत किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया राजगिरा रताळ्याची पुरी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
जेवणात चार घास जातील जास्त! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत लसूण लोणचं, नोट करून घ्या रेसिपी