नागपंचमीनिमित्त सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पारंपरिक तिळाच्या करंज्या
संपूर्ण देशभरात २९ जुलैला नागपंचमी सण साजरा केला जाणार आहे. नागपंचमीच्या दिवशी सगळीकडे नागाची पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य बनवला जातो. याशिवाय पारंपरिक पदार्थ बनवून नागाला अर्पण केले जातात. श्रावण महिन्यात सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी.अनेक गावांमध्ये नागाच्या वारुळाची पूजा केली जाते. नागपंचमीच्या नैवेद्यासाठी नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. त्यामुळे घरात तुम्ही तिळाच्या करंज्या बनवू शकता. तीळ खाणे आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी तिळाचे सेवन केले जाते. याशिवाय तिळामध्ये असलेले घटक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. तीळ आणि गुळाचे गोड सारण तयार करून बनवलेल्या करंज्या चवीला अतिशय सुंदर लागतात. जाणून घ्या तिळाच्या करंज्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Raksha Bandhan 2025 : लाडक्या भावासाठी घरी बनवा सोपा आणि झटपट तयार होणारा गव्हाच्या पिठाचा शिरा
श्रावणातील पहिल्या सोमवारी नैवेद्यासाठी झटपट बनवा फणसाचा शिरा, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी