
गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा राजस्थानी स्टाइल पंचरत्न डाळ
भारतीय स्वयंपाक घरात अतिशय आवडीने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे डाळभात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं डाळभात खायला खूप जास्त आवडते. मुगडाळ सहज पचन होते. त्यामुळे काहींना रोजच्या आहारात नेहमीच डाळ खाण्याची सवय असते. भातावर जर डाळ नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. कायम तिची ठराविक डाळ खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही राजस्थानी पद्धतीमध्ये पंचरत्न डाळ बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. याशिवाय डाळ खाल्ल्यामुळे शरीराला फायदेसुद्धा होतात. कमी पाणी आणि कमी तेलाचा वापर करून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. पाच वेगवेगळ्या डाळींचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. यामध्ये मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, चणा डाळ आणि उडीद डाळ या पाच डाळींचा वापर केला जातो. या डाळी चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी आहे. चला तर जाणून घेऊया राजस्थानी स्टाईल पंचरत्न डाळ बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)