
१५ मिनिटांत अस्सल गावरान पद्धतीमध्ये बनवा चमचमीत टोमॅटो शेव भाजी
दुपारच्या जेवणात प्रामुख्याने चपाती भाजी खाल्ली जाते. पण कायमच चपातीसोबत नेमकी कोणती भाजी बनवावी, हे सुचत नाही. कायमच भेंडी, भोपळा, कोबी, शिमला मिरची इत्यादी भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीत टोमॅटो शेव भाजी बनवू शकता. गावरान चवीची शेव भाजी चपाती किंवा भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते. गावाकडे बनवले जाणारे जेवण अतिशय कमी मसाले आणि साध्या पद्धतीमध्ये बनवले जाते. धावपळीच्या जीवनशैलीमुळे कायमच घरातील काम करताना सगळ्यांची घाई होते. घाईच्या वेळी नेमकं काय बनवावं? हे बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी टोमॅटो शेव भाजी अतिशय उत्तम पर्याय आहे. चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर कमीत कमी साहित्यात तुम्ही टोमॅटो शेव भाजी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया टोमॅटो शेव भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
लेमनग्रास टी: धावपळीच्या जीवनातील आरोग्य संजीवनी! दिवसातून एकदा घ्याच