गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा घट्टसर तूरडाळीचे वरण
जेवणाच्या ताटात प्रत्येकालाच चपाती, भाजी, डाळ, भात, लोणचं इत्यादी अनेक चमचमीत पदार्थ लागतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे डाळ, वरण. तूरडाळ आणि मूगडाळीचा वापर करून तिखट फोडणीची डाळ बनवली जाते. डाळ बनवताना त्यात लसूण, मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देऊन खमंग डाळ बनवली जाते. पण घाईगडबडीच्या वेळी डाळ शिजवण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये कुकरचा वापर करून चविष्ट डाळ बनवू शकता. डाळ बनवताना प्रामुख्याने तूर किंवा मुगडाळ कुकरच्या भांड्यात शिजवली जाते. त्यानंतर डाळीला फोडणी देऊन गरमागरम भातासोबत डाळ खाल्ली जाते. आजारी पडल्यानंतर गरमागरम भातासोबत तूरडाळीचे वरण आणि लोणचं खाण्यास दिले जाते. तूरडाळ सहज पचन होते त्यामुळे आहारात तूरडाळ आणि मूगडाळीचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. आज आम्ही तुम्हाला कमीत कमी साहित्यामध्ये झटपट घट्टसर तूरडाळीचे वरण बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ अतिशय कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो.(फोटो सौजन्य – istock)
तंदुरी चिकन खायचंय मग हॉटेलला कशाला जायचं? घरीच बनवा अन् सर्वांना करा खुश
दुपारच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कारल्याची सुकी चटणी! जेवणाला येईल रंगतदार चव