सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा उपवासाचा पुलाव
श्रावण महिन्यात महिलांसह पुरुषसुद्धा उपवास करतात.श्रावण महिन्यात केलेला उपवास आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. तसेच या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी महिला भगवान शंकराची मनोभावो पूजा करून करतात. उपवासाच्या दिवशी सर्वच घरांमध्ये साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, बटाट्याची भाजी, शिंगाड्याच्या पुऱ्या इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमीच साबुदाणे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही टेस्टी खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये उपवासाचा पुलाव बनवू शकता. याआधी तुम्ही मिक्स भाज्यांचा पुलाव, कडधान्याचा पुलाव खाल्ला असेल पण आज आम्ही तुम्हाला भगर पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. उपवास केल्यानंतर पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. अतितेलकट किंवा शेंगदाणे टाकून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास पित्त वाढू लागते. नेहमीच मसालेभात बनवताना भाज्यांचा वापर केला जातो. पण आज आम्ही भगर वापरून पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य –pinterest)
विकतची मिठाई आणण्यापेक्षा ब्रेडचा वापर करून झटपट बनवा मऊमऊ-रवाळ कलाकंद, नोट करून घ्या रेसिपी