Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Veg Kabab Recipe : व्हेज खाणाऱ्यांसाठी खास, अशाप्रकारे बनवा टेस्टी आणि ज्यूसी ‘व्हेज कबाब’

Recipe : शाकाहारी खाणाऱ्यांसाठी पर्वणी! संध्याकाळी लागणाऱ्या हलक्या भूकेसाठी घरी बनवा टेस्टी व्हेज कबाब. घरचे भाज्या खाण्यासाखी नखरे करत असल्यास भाज्यांपासून चविष्ट व्हेज कबाब तयार करुन तुम्ही कुटुंबाला खाऊ घालू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 25, 2026 | 09:40 AM
Veg Kabab Recipe : व्हेज खाणाऱ्यांसाठी खास, अशाप्रकारे बनवा टेस्टी आणि ज्यूसी 'व्हेज कबाब'

Veg Kabab Recipe : व्हेज खाणाऱ्यांसाठी खास, अशाप्रकारे बनवा टेस्टी आणि ज्यूसी 'व्हेज कबाब'

Follow Us
Follow Us:
  • कबाब अनेकांना फार आवडतात.
  • पारंपारिकरित्या ते चिकन किंवा मटणपासून तयार केले जातात.
  • पण तुम्ही भाज्यांपासूनही टेस्टी व्हेज कबाब बनवू शकता.
श्रावण सुरू झाला असून अनेकांनी महिनाभर नॉनव्हेज न खाण्याचा निर्धार केला आहे. अशात याकाळात अनेकजण नवनवीन व्हेज रेसिपीज ट्राय करू पाहतात. तुम्हीही काहीतरी नवीन आणि टेस्टी खाण्याचा विचार करत असाल तर व्हेज कबाब तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी नेहमी पोहे, उपमा किंवा भजी खाण्याचा कंटाळा आला असेल, तर घरच्या घरी चटपटीत व्हेज कबाब नक्की करून पाहा. विविध भाज्या, बटाटा आणि मसाल्यांचा वापर करून तयार केलेले हे कबाब बाहेरून हलके कुरकुरीत आणि आतून मऊ लागतात. विशेष म्हणजे या रेसिपीमध्ये आपल्या आवडीनुसार भाज्यांचे प्रमाण बदलता येते. मुलांच्या टिफिनसाठी, पाहुण्यांसाठी किंवा पार्टी स्नॅक्स म्हणूनही व्हेज कबाब हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’

साहित्य

  • २ उकडलेले बटाटे
  • १/२ कप बारीक चिरलेली गाजर
  • १/२ कप बारीक चिरलेले बीन्स
  • १/२ कप मटार
  • १/२ कप बारीक चिरलेली कोबी
  • १ छोटा कांदा बारीक चिरलेला
  • २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • १ टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • १/२ टीस्पून गरम मसाला
  • १/२ टीस्पून लाल तिखट
  • १/२ टीस्पून जिरेपूड
  • १/२ टीस्पून चाट मसाला
  • २ टेबलस्पून कोथिंबीर
  • ३ ते ४ टेबलस्पून ब्रेडक्रम्ब्स
  • २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
  • चवीनुसार मीठ
  • शॅलो फ्राय करण्यासाठी तेल
Pav Bhaji: बटरचा फुल्ल तडका अन् मसाल्याची झणझणीत चव! घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पावभाजी, वाचा रेसिपी

कृती

  • गाजर, बीन्स, मटार आणि कोबी हलके वाफवून किंवा थोड्या पाण्यात शिजवून घ्या. भाज्या पूर्णपणे मऊ न करता त्यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल याची काळजी घ्या.
  • एका मोठ्या भांड्यात उकडलेले बटाटे चांगले कुस्करून घ्या. त्यामध्ये शिजवलेल्या भाज्या, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि आले-लसूण पेस्ट घाला.
  • त्यात गरम मसाला, लाल तिखट, जिरेपूड, चाट मसाला, कोथिंबीर आणि मीठ घालून सर्व साहित्य एकत्र मिक्स करा.
  • मिश्रणामध्ये ब्रेडक्रम्ब्स आणि कॉर्नफ्लोअर घाला. सर्व साहित्य एकजीव करून घट्ट मिश्रण तयार करा. मिश्रण खूप सैल वाटत असल्यास थोडे ब्रेडक्रम्ब्स आणखी घालू शकता.
  • तयार मिश्रणाचे समान आकाराचे गोळे करून हाताने हलके दाबत गोल किंवा लांबट कबाबचा आकार द्या.
  • तव्यावर थोडे तेल गरम करून कबाब मध्यम आचेवर ठेवा. दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या हाताने शॅलो फ्राय करा. कबाब उलटताना तुटणार नाहीत याची काळजी घ्या.
  • तयार व्हेज कबाब प्लेटमध्ये काढून गरमागरम सर्व्ह करा. सोबत हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा दही-पुदिन्याची डिप दिल्यास चव आणखी खुलते.

Web Title: How to make veg kabab at home note the marathi recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी
1

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट राजगिऱ्याचा उपमा, फक्त १० मिनिटांची आहे रेसिपी

Cake At Home: मैद्याला करा बाय-बाय! ज्वारीच्या पिठापासून सोप्या पद्धतीत बनवा घरच्या घरी बनवा टेस्टी केक, नोट करा रेसिपी
2

Cake At Home: मैद्याला करा बाय-बाय! ज्वारीच्या पिठापासून सोप्या पद्धतीत बनवा घरच्या घरी बनवा टेस्टी केक, नोट करा रेसिपी

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
3

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
4

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.