Besan Barfi Recipe : मऊ, गोड आणि तोंडात टाकताच विरघळणारी बेसन बर्फी श्रावणी सोमवाराच्या पूजेसाठी एक चांगला पर्याय ठरेल. अहो, विकत कशाला जर तुम्ही घरीच ही रेसिपी अर्ध्या तासात तयार करु शकता. रेसिपी नोट करा.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
श्रावणातील सोमवाराला फार महत्त्व आहे.
या दिवशी भाविक भगवान शंकराची पूजा करतात.
पूजेत गोड पदार्थ म्हणून तुम्ही बेसनाची बर्फी तयार करु शकता.
श्रावणात सोमवाराला फार महत्त्व. या दिवशी लोक भगवान शिवाची पूजा करून त्याला नैवेद्य अर्पण करतात. श्रावणी सोमवारच्या दिवशी उपवासानंतर किंवा नैवेद्यासाठी गोड पदार्थ करायचा असेल, तर घरच्या घरी बनवलेली बेसन बर्फी उत्तम पर्याय ठरू शकते. अनेकदा आपण मलाई बर्फी, आंबा बर्फी किंवा वेगवेगळ्या बर्फींची चव चाखतो पण बेसन बर्फी हा सहज आणि कमी साहित्यापासून तयार होणारा पदार्थ आहे. बर्फीची खासियत म्हणजे तोंडात टाकताच ती विरघळली जाते. भाजलेल्या बेसनाचा सुगंध, साजूक तुपाची चव आणि साखरेचा गोडवा यामुळे ही बर्फी खमंग आणि स्वादिष्ट लागते. कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही बर्फी प्रसादासाठीही करता येते. जेवणानंतर काही गोड खाण्यासाठी म्हणूनही तुम्ही ही रेसिपी ट्राय करु शकता. चला रेसिपीसाठीलागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.