
१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर घरात गोडाचे विविध पदार्थ बनवले जातात. उपवासाच्या दिवशी नैवेद्यात काय बनवावं? असा प्रश्न सर्वच महिलांना कायमच पडतो. नेहमीच शेवयांची खीर, तांदळाची खीर किंवा गुलाबजाम खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही पारंपरिक पद्धतीमध्ये गव्हाची खीर बनवू शकता. श्रावण महिन्यात येणाऱ्या सणावारांच्या दिवशी विविध गोड पदार्थ बनवले जातात. यामुळे सणाची रंगत आणखीनच वाढते. या पद्धतीने बनवलेली गव्हाची खीर घरातील प्रत्येक व्यक्तीला खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा मस्त लागेल. हा पदार्थ केवळ उपवासाच्या दिवशीच नाहीतर इतर वेळी सुद्धा बनवू शकता. गव्हामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असते तर गुळामध्ये आयर्न आढळून येते. उपवासाच्या दिवशी शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी कायमच तेलकट पदार्थ खाण्याऐवजी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – pinterest)