Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Peepal Tree Removal Tips: भिंतीच्या भेगेत उगवलेला पिंपळ कसा काढाल? मिठाचा उपाय करण्याआधी ‘हे’ जाणून घ्या!

Peepal Tree Removal Tips: घराच्या छतावर, गच्चीवर किंवा भिंतीच्या भेगांमध्ये उगवणारे पिंपळाचे रोप वेळीच काढणे गरजेचे आहे. पिंपळाची मुळे भिंतीतील भेगांमध्ये वाढल्याने तडे जाणे, प्लास्टर निघणे आणि पावसाचे पाणी घरात झिरपणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. मिठामुळे झाड वाळण्यास मदत होऊ शकते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 23, 2026 | 11:59 AM
Peepal Tree Removal Tips: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Peepal Tree Removal Tips: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भिंतीत उगवलेला पिंपळ वेळीच काढा
  • मिठाचा उपाय १००% प्रभावी नाही
  • झाड काढल्यानंतर भेगा बुजवणं गरजेचं

How to Remove a Peepal Tree Growing in Walls: बऱ्याच घरांमध्ये हा प्रॉब्लेम दिसतो. छतावर, भिंतीच्या भेगांमध्ये किंवा गच्चीच्या कोपऱ्यात अचानक पिंपळाचं छोटंसं रोप उगवतं. सुरुवातीला ते अगदी छोटं दिसतं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण म्हणतो की, छोटसं रोपटं आहे, सुकून जाईल आणि मरेल. पण हेच दुर्लक्ष नंतर महागात पडू शकतं. त्याची मुळं हळूहळू भिंतीच्या आत जातात आणि मग भिंतीला तडे जायला लागतात, पावसाचं पाणी घरात झिरपायला लागतं. Peepal Tree Removal Tips:

त्यामुळे ते वेळीच काढणं खूप गरजेचं आहे. पण ते कसं काढायचं? अनेकजण मीठ टाकून वाळवण्याचा उपाय सांगतात, तो योग्य आहे का? युट्युबवर ‘सुरेंद्र की दुनिया’ नावाने फेमस असलेल्या सुरेंद्र यांनी यावर एक सोपा घरगुती उपाय सांगितला आहे.

भिंतीत पिंपळाचं झाड येतंच कसं?

पिंपळाच्या बिया खूप हलक्या असतात. वाऱ्यामुळे किंवा पक्ष्यांच्या विष्ठेमधून त्या आपल्या घराच्या छतावर, भिंतीच्या फटीत येऊन पडतात. तिथे थोडी धूळ, माती आणि पावसाचं पाणी मिळालं की त्याला लगेच कोंब फुटतो. सुरुवातीला ते दोन पानांचं छोटं रोप असतं, पण त्याची वाढ खूप फास्ट होते. म्हणून छतावर कुठे हिरवं काही दिसलं तर लगेच लक्ष द्या.

यामुळे भिंतीला खरंच भेगा पडतात का?

पिंपळाची मुळं खूप मजबूत असतात. ती आधीच असलेल्या छोट्या भेगांमध्ये शिरतात आणि आत वाढत जातात. मुळं जाड झाली की भेगा अजून रुंद होतात. मग काय, भिंतीवर ओले डाग दिसायला लागतात, प्लास्टर निघायला लागतं आणि कधी कधी तर पावसाळ्यात भिंतीतून पाणीच यायला लागतं. जर तुमच्या भिंतीला ओलसरपणा वाटत असेल तर एकदा वर जाऊन नक्की चेक करा, कुठे झाड तर नाही ना उगवलं.

मीठ टाकून झाड वाळवणं योग्य आहे का?

गावाकडे किंवा घरगुती उपायांमध्ये बरेच जण सांगतात की पिंपळावर मीठ टाका, आपोआप वाळून जाईल. मीठ टाकल्याने काय होतं, तर मातीतला खारटपणा वाढतो आणि मुळांना पाणी शोषता येत नाही, त्यामुळे झाड वाळतं.पण हा उपाय 100% यशस्वी नाहीच. कधी कधी मीठ टाकून पण झाड वाळत नाही, वरून वाळल्यासारखं दिसतं पण मुळं आत जिवंतच राहतात.

काय आहे Zero Salt Diet? महिनाभराने शरीरावर कसा होईल परिणाम

दुसरा मोठा तोटा म्हणजे जास्त मीठ टाकलं तर आजूबाजूची माती खराब होते. तिथे तुम्ही दुसरं कोणतंही झाड लावलं तर ते पण येणार नाही. भिंतीच्या आत एवढं मीठ टाकणं पण चांगलं नाही. म्हणून फक्त मीठ टाकण्याच्या भानगडीत पडू नका.

मग योग्य पद्धत काय आहे?

जर रोप अगदी छोटं असेल, म्हणजे अजून हाताने उपटता येईल एवढं, तर लगेच काढून टाका. मुळासकट निघेल याची काळजी घ्या. हातात ग्लोव्हज घाला आणि खुरप्याच्या मदतीने हलकेच काढा.पण जर झाड थोडं मोठं झालं असेल, त्याची मुळं भिंतीत खोल गेली असतील किंवा ते छताच्या कडेला अशा धोक्याच्या ठिकाणी उगवलं असेल जिथे तुम्हाला पोहोचता येत नाही, तर स्वतः काही करू नका. अशावेळी एखाद्या माळ्याला किंवा बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीला बोलवा. ते योग्य प्रकारे ते काढून देतील.

झाड काढल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कामबऱ्याच जणांची चूक काय होते, झाड काढलं की झालं. पण तसं नाही. झाड काढल्यावर तिथे एक मोठी भेग तयार होते. त्या भेगेत माती, मुळांचे तुकडे आणि ओलावा राहतो. ती भेग तशीच ठेवली तर पावसाचं पाणी तिथून आत जाणारच.

म्हणून झाड काढल्यावर ती जागा व्यवस्थित साफ करा. तिथे सिमेंट आणि वॉटरप्रूफिंग केमिकल टाकून ती भेग पूर्णपणे बुजवून घ्या. तरच तुमची भिंत पुन्हा मजबूत होईल.

Health Tips: चवीच्या नादात जास्त मीठ खाताय? आरोग्यासाठी ठरू शकते …

परत झाड येऊ नये म्हणून काय करायचं?

छत आणि गच्ची नेहमी साफ ठेवा. पालापाचोळा, माती साचू देऊ नका. पाणी साचत असेल तर त्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करा. पावसाळ्याच्या आधी एकदा पूर्ण छत चेक करा, कुठे भेगा आहेत का, कुठे छोटं रोप आलंय का. वेळीच लक्ष दिलं तर मोठा खर्च वाचेल.थोडक्यात, पिंपळाचं झाड दिसलं की त्याला लहान समजून सोडू नका. वेळीच काढा आणि भिंतीची दुरुस्ती करून घ्या, नाहीतर नंतर घर कमकुवत व्हायला वेळ लागणार नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घराच्या भिंतीत पिंपळाचे झाड कसे उगवते?

    Ans: वाऱ्याने किंवा पक्ष्यांमार्फत पिंपळाच्या बिया भिंतीच्या भेगांमध्ये पोहोचतात. तिथे माती, धूळ आणि पाणी मिळाल्यावर त्यांना कोंब फुटतो.

  • Que: पिंपळाचे झाड वाळवण्यासाठी मीठ टाकणे योग्य आहे का?

    Ans: मिठामुळे झाड वाळू शकते; मात्र हा उपाय १००% प्रभावी नाही. जास्त मिठामुळे आजूबाजूची मातीही खराब होऊ शकते.

  • Que: पिंपळाचे झाड काढल्यानंतर काय करावे?

    Ans: झाड काढल्यानंतर भेग स्वच्छ करून सिमेंट आणि वॉटरप्रूफिंगच्या मदतीने व्यवस्थित बुजवावी.

Web Title: How to remove peepal tree from wall salt remedy rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • lifestlye tips
  • Marathi News
  • Phil Salt

संबंधित बातम्या

Shruti Marathe Gorgeous Gown Look: श्रुती मराठेच्या अदा पाहून चाहते फिदा! गाऊनमधील लुकची सोशल मीडियावर चर्चा
1

Shruti Marathe Gorgeous Gown Look: श्रुती मराठेच्या अदा पाहून चाहते फिदा! गाऊनमधील लुकची सोशल मीडियावर चर्चा

Karan Tacker New Project: करण टैकरच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा; स्कॉटलंडमध्ये नव्या प्रोजेक्टचं शूटिंग सुरू
2

Karan Tacker New Project: करण टैकरच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा; स्कॉटलंडमध्ये नव्या प्रोजेक्टचं शूटिंग सुरू

Mi Jinkun Ghein Saara Marathi Serial: छवी देणार अनिकेतला प्रेमाची कबुली! ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये रंगणार प्रेमाचा नवा अध्याय
3

Mi Jinkun Ghein Saara Marathi Serial: छवी देणार अनिकेतला प्रेमाची कबुली! ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये रंगणार प्रेमाचा नवा अध्याय

AI ला शिवीगाळ केली तर होणार कारवाई? Anthropic चा नवा नियम चर्चेत
4

AI ला शिवीगाळ केली तर होणार कारवाई? Anthropic चा नवा नियम चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.