
कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणे
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीरात दिसून येणारी लक्षणे?
कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी उपाय?
कॅल्शियम वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
संपूर्ण मानवी शरीर हाडांपासून बनवलेले असते. हाडे संपूर्ण शरीराला उभं राहण्याची ऊर्जा आणि ताकद देतात. याशिवाय मेंदूचे रक्षण करणारी कवटी आणि हृदय, फुफ्फुसांचे रक्षण करणाऱ्या बरगड्या हाडांपासूनच तयार होतात. त्यामुळे शरीरातील हाडे मजबूत असणे आवश्यक आहे. पण बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे जास्त लक्ष दिले जात नाही. मानसिक तणाव, आहारात होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता, पाण्याचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची आवश्यकता असते. पण बऱ्याचदा विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरसंबंधित अनेक गंभीर आजारांची लागण होते.
शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडांमध्ये वेदना होणे, थकवा, अशक्तपणा इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. कॅल्शियमची पातळी कमी झाल्यानंतर सगळ्यात आधी हाडांवर परिणाम होतो आणि त्यानंतर संपूर्ण जीवनशैलीवर परिणाम होतो. त्यामुळे म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने उपचार करून शरीराची काळजी घ्यावी.
कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर प्रामुख्याने हाडांमध्ये वेदना वाढू लागतात. अचानक कंबर दुखणे, पाठ दुखणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सुरुवातीला अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात, मात्र कालांतराने हीच लक्षणे अतिशय तीव्र होतात आणि शरीराला गंभीर आजारांची लागण होते. कॅल्शियमची कमतरता अधिककाळ शरीरात टिकून राहिल्यास ऑस्टियोपेनिया किंवा ऑस्टियोपोरोसिस आजार होऊ शकतात.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हातापायांमध्ये पेटके येण्यास सुरुवात होते. स्नायू कडक होणे, पेटके येणे किंवा मुंग्या येणे ही लक्षणे प्रामुख्याने हात, पाय, बोटे इत्यादी अवयवांमध्ये जाणवू लागतात. शरीरात रात्रीच्या वेळी अधिक पेटके येतात. शरीराच्या स्नायूंना पुरेशा प्रमाणात कॅल्शियम न मिळाल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात.
शरीरात निर्माण झालेल्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दातांमध्ये वेदना होणे, अचानक दात तुटणे, नखांवरवं पांढरा थर तयार होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय दात किडणे, संवेदनशीलता आणि हिरड्या दुखणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. याशिवाय कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर पडल्यानंतर सहज हाडे तुटणे किंवा हाडांची घनता कमी होऊन जाते.