Blood circulation मध्ये अडथळे निर्माण झाल्यास पायांमध्ये दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे
दीर्घकाळ निरोगी आणि फिट राहण्यासाठी शरीराला रक्ताची आवश्यकता असते. त्यासोबतच शरीरातील रक्त सर्वच अवयवांपर्यंत योग्य प्रमाणात पोहचणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. शरीरातील अतिशय महत्वाची प्रक्रिया म्हणजे ब्लड सर्कुलेशन (रक्तप्रवाह). शरीरात रक्त सर्वच अवयवांपर्यंत व्यवस्थित पोहोचल्यास शरीरात कोणतेही अडथळे निर्माण होत नाहीत. पण काहीवेळा एका जागेवर जास्त वेळ बसून राहिल्यामुळे किंवा मेंदूसंबंधित समस्या उद्भवल्यामुळे रक्तभिसरणात अनेक अनेक अडथळे निर्माण होतात. यामुळे शरीरसंबंधित अनेक वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. याचा परिणाम पायांवर लगेच दिसून येतो. धमण्यांमध्ये ब्लॉकेज होणे, डायबिटीस, नसांमध्ये ताण इत्यादी अनेक कारणामुळे शरीराच्या रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यानंतर पायांमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यानंतर पायांच्या टाचांमध्ये वेदना होतात. याशिवाय काहीवेळा पायांना सूज सुद्धा येते. रक्तभिसरण व्यवस्थित न झाल्यामुळे फ्लुइड टाच आणि पायांच्या टिश्यूजमध्ये तसेच साचून राहते. ज्यामुळे काहीवेळा उभे राहिल्यानंतर पायांमध्ये अतिशय वेदना होतात. तसेच त्वचेवर बोटाने दाबल्यास खड्डे होतात. ही समस्या अतिशय सामान्य वाटते. हृदयाची कमजोरी, किडनीच्या समस्या किंवा नसांमध्ये वाढलेल्या कमजोरीमुळे पाय आणि टाचांमध्ये वेदना होतात.
बऱ्याचदा पायांना स्पर्श केल्यानंतर पाय अतिशय थंड वाटतात. रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यानंतर पाय अतिशय थंड पडतात. पायांपर्यंत गरम रक्त व्यवस्थित न पोहचल्यामुळे पाय कायमच थंड राहतात. याला थायरॉइड किंवा पेरिफेरल आर्टरी डिसीज असे सुद्धा म्हणतात. त्यामुळे रक्तभिसरणात अडथळे झाल्यास शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
रक्तभिसरणात अडथळे निर्माण झाल्यास मांडी, पोटऱ्या किंवा तळपायात अचानक क्रॅम्प येऊन वेदना होतात. याशिवाय यूंना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे स्नायू आकुंचन पावतात आणि वेदना वाढू लागतात. स्नायूंमध्ये वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत.
शरीराचे बिघडलेले रक्तभिसरण सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. याशिवाय नियमित चालणे, स्विमिंग, सायकल चालवणे किंवा जॉगिंग इत्यादी सर्व व्यायाम प्रकार करावेत. यामुळे हृयद्याचे ठोके वाढतात आणि शरीराचा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. याशिवाय रोजच्या आहारात ताज्या भाज्या, पालेभाज्या, फळे, धान्ये आणि अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी पदार्थांचा समावेश करावा.
रक्ताभिसरण संस्था कशी काम करते?
ही संस्था मुख्यत्वे तीन रक्तवाहिन्यांनी (धमनी, शिरा आणि केशवाहिन्या) बनलेली असते.या रक्तवाहिन्यांच्या जाळ्याद्वारे शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्तपुरवठा होतो.रक्त ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये शरीरातील पेशींपर्यंत पोहोचवते.
रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी काय करावे?
व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ खा, जे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. टोमॅटो, ड्राय फ्रुटस आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. पुरेसे पाणी प्या.
खराब रक्ताभिसरणाची लक्षणे कोणती?
हात-पाय थंड पडणे, हात-पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे, हात-पायांमध्ये वेदना होणे, स्नायू क्रॅम्प (स्नायू आखडणे).