Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिघडलेले हार्मोन्स नैसर्गिकरित्या होतील कंट्रोल! शरीरात दिसणाऱ्या थायरॉईडच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

थायरॉईड झाल्यानंतर शरीरात असंख्य बदल जाणवू लागतात. या बदलांकडे महिलांनी लक्ष देणे आवश्यक आहे. हार्मोनचे बिघडलेली संतुलन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 09, 2026 | 08:30 AM
बिघडलेले हार्मोन्स नैसर्गिकरित्या होतील कंट्रोल! शरीरात दिसणाऱ्या थायरॉईडच्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

बिघडलेले हार्मोन्स नैसर्गिकरित्या होतील कंट्रोल! शरीरात दिसणाऱ्या थायरॉईडच्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Follow Us
Close
Follow Us:

थायरॉईड म्हणजे काय?
बिघडलेले हार्मोन्स कंट्रोल करण्यासाठी उपाय?
शरीरात हार्मोन्स असंतुलित का होतात?

चुकीची जीवनशैली, पोषक घटकांचा अभाव, मानसिक तणाव, शारीरिक हालचालींची कमतरता, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा आजार म्हणजे थायरॉइड. थायरॉइड ग्रंथी शरीरास आवश्यक असलेले हार्मोन्स तयार करते, पण हेच हार्मोन्स तयार करताना अडथळे निर्माण झाल्यास शरीरात अनेक बदल होतात. याला हायपोथायरॉइडिझम असे म्हणतात. शरीरातील ग्रंथी कमी गतीने काम करत असल्यास थायरॉइड वाढण्याची शक्यता असते. ज्याच्या परिणामामुळे शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. थायरॉइड ग्रंथी गरजेपेक्षा जास्त काम करतात त्या स्थितीला हायपर थायरॉइडिझम असे म्हणतात. शरीरात थायरॉइडची पातळी वाढल्यानंतर घशात वेदना होणे, घसा दुखणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. जगभरातील सुमारे १२% लोकांच्या त्यांच्या आयुष्यात एकदा तरी थायरॉइडच्या समस्येला सामोरे जावे लागते. चला तर जाणून घेऊया थायरॉइड झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे आणि थायरॉइड कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय.(फोटो सौजन्य – istock)

तरुण वयात Breast Cancer होण्यास कारणीभूत ठरतात ‘ही’ गंभीर कारणे, स्तनात गाठी होऊ नये आहारात करा बदल

थायरॉइडचा संपूर्ण शरीरावर कसा परिणाम होतो:

भारतामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांना थायरॉइडची लागण होते. वेगवेगळ्या प्रकारच्या थायरॉइडमुळे शरीरात विविध लक्षणे जाणवू लागतात. तसेच थायरॉइड हा कोणताही आजार नसून शरीरातील एक ग्रंथी आहे. वाढत्या वयात शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे थायरॉइड वाढण्याची शक्यता असते. हायपोथायरॉईडीझम झाल्यानंतर ग्रंथी कमी प्रमाणात हार्मोन्स तयार करतात, ज्यामुळे शरीराची प्रक्रिया मंदावते. यामुळे झपाट्याने वजन वाढणे यांसारखी विविध लक्षणे दिसू लागतात. हायपरथायरॉईडीझम झाल्यानंतर ग्रंथी गरजेपेक्षा जास्त हार्मोन्स तयार करते, ज्यामुळे शरीराची क्रिया वेगवान होते आणि वजन झपाट्याने कमी होऊन जाते.

थायरॉइड झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • वजन झपाट्याने कमी होणे किंवा वाढणे
  • हृदयाची धडधड वाढणे
  • सतत थकवा अशक्तपणा जाणवणे
  • चक्कर येणे
  • चेहरा व पायांना सूज येणे
  • अशक्तपणा जाणवणे
  • आळस येणे
  • भूक मंदावणे
  • जास्त झोप येणे
  • महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्या
  • केस गळणे
  • गर्भधारणेमध्ये समस्या उद्भवणे किंवा वंध्यत्व
वयाच्या तिशीनंतर महिलांनी आहारात करायला हव्यात ‘या’ विटामिन युक्त पदार्थांचे सेवन, चेहऱ्यावर तारुण्य राहील कायम टिकून

थायरॉईड झाल्यानंतर कोणते उपाय करावेत?

थायरॉईड झाल्यानंतर घाबरून न जाता वेळीच योग्य ते औषध उपचार आणि चाचण्या करून निदान करावे. यामुळे शरीराला आराम मिळतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्ताची ‘TSH, T3, T4’ चाचणी करून घ्यावी. याशिवाय थायरॉईडची औषध रिकाम्या पोटी खावीत. थायरॉईड झाल्यानंतर दैनंदिन आहारात अक्रोड, बदाम, अंडी, मासे (ओमेगा-३ साठी), आयोडीनयुक्त मीठ, ब्राझील नट्स इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळेल आणि थायरॉईड नियंत्रणात राहण्यास मदत होते. थायरॉईड झाल्यानंतर तो कधीच पूर्णपणे बरा होत नाही. त्यामुळे जीवनशैलीत बदल करून शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: थायरॉईडची प्रमुख लक्षणे कोणती?

    Ans: सतत थकवा आणि अशक्तपणा, अकारण वजन वाढणे (हायपो) किंवा कमी होणे.

  • Que: थायरॉईडमध्ये काय खावे आणि काय टाळावे?

    Ans: कच्ची कोबी, ब्रोकोली, फ्लॉवर, सोयाबीन पदार्थ (सोया मिल्क, टोफू).

  • Que: थायरॉईडची औषधे कशी घ्यावीत?

    Ans: लेव्होथायरॉक्सिन (Levothyroxine) सारखी औषधे सहसा सकाळी रिकाम्या पोटी, नाश्त्याच्या किमान ३०-६० मिनिटे आधी घेणे सर्वात प्रभावी मानले जाते.

Web Title: Disturbed hormones will be controlled naturally do not ignore these symptoms of thyroid in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • thyroid care

संबंधित बातम्या

हृदयविकाराच्या उपचारांमध्येही लिंगभेद? सायन रुग्णालयाच्या आकडेवारीत पुरुष रुग्णांचे वर्चस्व; महिलांमध्ये लक्षणे दुर्लक्षित
1

हृदयविकाराच्या उपचारांमध्येही लिंगभेद? सायन रुग्णालयाच्या आकडेवारीत पुरुष रुग्णांचे वर्चस्व; महिलांमध्ये लक्षणे दुर्लक्षित

केस किंवा नख कापताना वेदना का होत नाहीत? यागील कारण वाचून तुम्हाला सुद्धा बसेल आश्चर्यकारक धक्का
2

केस किंवा नख कापताना वेदना का होत नाहीत? यागील कारण वाचून तुम्हाला सुद्धा बसेल आश्चर्यकारक धक्का

थॅलेसेमियाग्रस्तांच्या स्वप्नांना मिळणार बळ! ‘चाइल्ड हेल्प फाऊंडेशन’कडून विशेष केंद्राची स्थापना
3

थॅलेसेमियाग्रस्तांच्या स्वप्नांना मिळणार बळ! ‘चाइल्ड हेल्प फाऊंडेशन’कडून विशेष केंद्राची स्थापना

‘स्ट्रोक’साठी सर्वसमावेशक आराखडा! समिट आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली महाराष्ट्र स्ट्रोक समिटमध्ये तज्ज्ञांची चर्चा
4

‘स्ट्रोक’साठी सर्वसमावेशक आराखडा! समिट आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली महाराष्ट्र स्ट्रोक समिटमध्ये तज्ज्ञांची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.