पोटतात वाढलेल्या पित्तामुळे सतत आंबट ढेकर येतात? 'हा' घरगुती उपाय ठरेल प्रभावी
दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. शरीरात वाढलेल्या तीव्र ऍसिडिटीमुळे काम करताना अनेक अडथळे निर्माण होतात. खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन न झाल्यामुळे आतड्यांमध्ये घाण तशीच साचून राहते, ज्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात, ज्यामुळे पोटात ऍसिडिटी वाढते आणि आंबट ढेकर येऊन उलट्या, मळमळ इत्यादी समस्या उद्भवतात. शरीरात वाढलेल्या ऍसिडिटीवर वेळीच लक्ष न दिल्यास हार्ट अटॅक सारखी लक्षणे शरीरात दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटात वाढलेली ऍसिडिटी आणि पित्त कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यास शरीर आतून स्वच्छ होईल आणि आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल.(फोटो सौजन्य – istock)
पोटात वाढलेल्या गॅसमुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. यामुळे पोट फुगणे, उलट्या, मळमळ, हृदयात जडपणा जाणवणे, अस्वस्थता, मनाची घालमेल इत्यादी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे काहीवेळा खूप जास्त अस्वस्थपणा वाढू लागतो. शरीरात वाढलेल्या ऍसिडिटीमुळे खाल्ले अन्नपदार्थ पचन होत नाही. अशावेळी अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण वारंवार गोळ्या औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरते. त्यामुळे पोटात वाढलेली ऍसिडिटी नियंत्रणात ठेवण्यासाठी घरगुती उपाय करावेत.
पोटात वाढलेला गॅस, पित्त कमी करण्यासाठी एक ग्लास पाणी टोपात घेऊन उकळवून घ्या. त्यानंतर त्यात हिंग, काळीमिरी पावडर, सुंठ पावडर घालून व्यवस्थित उकळी काढून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. त्यानंतर पाण्यात चिमूटभर मीठ टाकून मिक्स करा. तयार केलेले पाणी उपाशी पोटी सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल. याशिवाय गरम पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. या मिश्रणाच्या सेवनामुळे पोटात वाढलेला गॅस, जुलाब इत्यादी समस्यांपासून आराम मिळेल.
शरीरात वाढलेला उलटा गॅस कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. यासोबतच रोज १०० पावले चालणे, हलका व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. पोटाची व्यवस्थित काळजी घेतल्यास अन्नाचे योग्य पचन, गॅस कमी होणे आणि उर्जेची जाणीव कायम राहते. त्यामुळे ऍसिडिटी, गॅस कमी करण्यासाठी घरगुती हेल्दी ड्रिंकचे सेवन करावे.
ऍसिडिटी म्हणजे काय?
ऍसिडिटी ही एक सामान्य पचन समस्या आहे, जी पोटात जास्त प्रमाणात ऍसिड तयार झाल्यामुळे होते.
ऍसिडिटीसाठी घरगुती उपाय कोणते आहेत?
एक चमचा बेकिंग सोडा कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने ऍसिड कमी होऊ शकते. आल्याचा छोटा तुकडा चघळणे किंवा आल्याचा चहा पिणे फायदेशीर ठरते.
ऍसिडिटीसाठी काय खावे आणि काय टाळावे?
मसालेदार, तेलकट पदार्थ, जंक फूड आणि खूप जास्त चहा किंवा कॉफी पिणे टाळा. फळे, भाज्या, आणि हलके जेवण घेणे फायदेशीर ठरू शकते. जेवणाच्या वेळा नियमित ठेवा.