आरोग्यासंबंधित गंभीर समस्या
धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. या समस्या उद्भवल्यानंतर हळूहळू त्यांची लक्षणे दिसू लागतात. आरोग्यसंबंधित छोटीमोठी लक्षणे दिसू लागल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यानंतर पूढे जाऊन त्याचे गंभीर आजारांमध्ये रूपांतर होते. अनेकदा आहार किंवा व्यायाम न करतात वजन कमी होण्यास सुरुवात होते, सतत धाप लागणे, वारंवार ताप किंवा सर्दी होणे, सतत खोकला लागणे इत्यादी समस्या जाणवू लागल्यानंतर दुर्लक्ष केले जाते. पण या आजारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुढे जाऊन हेच आजार मोठे होतात.(फोटो सौजन्य-istock)
अनेक लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात, पण काहींचे वजन कोणत्याही गोष्टी न करता कमी होण्यास सुरुवात होते. सतत वजन कमी झाल्यामुळे मधुमेह, थायरॉईड डिसऑर्डर किंवा कर्करोग यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. स्ट्रेस डिसऑर्डर, एनोरेक्सिया, बुलिमिया इत्यादी आजार होऊ शकतात. वजन कमी होण्याची लक्षणे जाणवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी.
हे देखील वाचा: केसांच्या समस्यांपासून सुटका हवीये? मग ‘या’ आयुर्वेदिक पानांचा करा वापर, केसांचे वाढेल सौंदर्य
काम करताना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर मनात अनेक शंका निर्माण होतात. दम्याचा त्रास असलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो. अशा व्यक्तींनी जास्त काम किंवा उंच डोंगर असलेल्या ठिकाणी जाऊ नये. त्यामुळे श्वासासंबंधित समस्या उद्भवू लागतात. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट फेल्युअर, व्हॉल्व्ह डिसऑर्डर कधीकधी कार्डियाक अस्थमासारख्या आजारांचा धोका वाढतो.
खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतता. काहींना सतत ताप किंवा सर्दी होते. आजारी पडल्यानंतर आजार लवकर बरा न होणे, अशक्तपणा इत्यादी अनेक समस्या जाणवतात.शरीरामध्ये पोषक घटकांची कमतरता किंवा आरोग्यसंबंधित गंभीर समस्या उद्भवल्यानंतरच व्यक्ती वारंवार आजारी पडू लागतो.
हे देखील वाचा: मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित करा झुंबा वर्कआऊट, जाणून घ्या फायदे
शरीरामध्ये पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर रात्रीच्या वेळी किंवा इतर वेळी नीट झोप लागत नाही. झोप पूर्ण न झाल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. अपचन, ऍसिडिटी इत्यादी समस्या जाणवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.