शेवग्याच्या शेंगांच्या पानांचे पाणी कसे तयार करावे?
सर्वच महिला केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहेत. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर केसांमध्ये टक्कल पडेल की काय अशी भीती महिलांना वाटू लागते. चुकीच्या पद्धतीने केस विंचरल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे केस मोठ्या प्रमाणावर गळतात. केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, सतत बाहेरचे पदार्थ खाणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम लगेच आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. केसांचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी केमिकलयुक्त प्रॉडकटचा वापर न करता आयुर्वेदिक आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा.
केसांच्या समस्यांमध्ये वाढ झाल्यानंतर अनेक महिला केमिकल युक्त ट्रीटमेंट करून घेण्यास प्रथम प्राधान्य देतात. पण यामुळे काहीकाळ केस अतिशय सुंदर दिसतात, पण कालांतराने केसांची चमक निघून जाऊन केस खराब होण्यास सुरुवात होते. केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे केसांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या पानांचा वापर केसांसाठी कसा करायचा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शेवग्याच्या शेंगांच्या पानांमध्ये विटामिन सी आणि केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व गुणधर्म आढळून येतात.(फोटो सौजन्य-istock)
शेवग्याच्या शेंगांच्या पानांचे पाणी कसे तयार करावे?
शेवग्याच्या शेंगांची पाने केस गळतीवर आयुर्वेदिक उपाय आहे. मागील अनेक वर्षानूपासून केस गळण्याच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी शेवग्याच्या पानांचा वापर केला जात आहे. या पानांमध्ये विटामिन ए भरपूर आढळून येते. फॅटी ऍसिड, अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा-३, फॅटी ऍसिडस्, फोलेट आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळून येते. टाळूवर इन्फेक्शन रोखण्यासाठी आणि केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी ही पाने मदत करतात. केसांच्या मुळांचे नुकसान होऊ नये शेवग्याच्या पानांचा वापर करावा.
हे देखील वाचा: मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित करा झुंबा वर्कआऊट, जाणून घ्या फायदे
शेवग्याच्या शेंगांच्या पानांचे पाणी बनवण्यासाठी टोपामध्ये पाणी घेऊन त्यात ताजी शेवग्याची पाने टाकून पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर उकळवून घेतलेले पाणी गाळून थंड करा. तयार करून घेतलेले शेवग्याच्या पानांचे पाणी केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत सगळीकडे लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने केसांच्या मुळांमध्ये मसाज करा. त्यानंतर 30 मिनिटं केस असेच ठेवून शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ करा. यामुळे तुमच्या केसांची वाढ होण्यास मदत होईल आणि केस गळणे सुद्धा थांबेल.