मसालेदार ओट्स खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट बनवा हेल्दी टेस्टी ओट्स पॅनकेक
सकाळच्या नाश्त्यात अनेकांना ओट्स खाण्याची सवय असते. ओट्स कधी कांदा टोमॅटो टाकून बनवले जातात तर कधी दूध आणि वेगवेगळी मिक्स फळे टाकून बनवले जातात. वाढलेले वजन कमी करताना सकाळच्या नाश्त्यात अनेकांना कायमच ओट्स खाण्याची सवय असते. सकाळच्या घाईगडबडीमध्ये ओट्स अतिशय झटपट तयार होतात. कमीत कमी साहित्यात झटपट बनवलेला नाष्ट्यातील पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. पण नेहमीच तेच मसालेदार ओट्स खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ओट्स पॅनकेक बनवू शकता. पॅनकेक हा पदार्थ लहान मुलं खूप आवडीने खातात. यासाठी पॅनकेक तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. पॅनकेक हा केवळ पदार्थ नसून शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरणारा पदार्थ आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात तुम्ही ओट्स पॅनकेक बनवू शकता. चला तर जाणून घेऊया ओट्स पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






