
महिनाभर साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर दिसून येतात 'हे' सकारात्मक परिणाम
साखर खाल्ल्यामुळे शरीरावर होणारे परिणाम?
साखर खाण्याचे फायदे?
मधुमेह असलेल्या रुग्णांनी साखर खावी की नाही?
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना साखरेचा वापर केला जातो. गोड चवीची साखर लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडते. बऱ्याचदा वजन वाढल्यानंतर ते नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर पूर्णपणे बंद केली जाते. याशिवाय मधुमेहाच्या समस्येने त्रस्त असलेले लोक अजिबात साखर खात नाहीत. पण काहींना अतिगोड पदार्थ खाण्याची सवय असते. साखरेमध्ये रिक्त कॅलरी आढळून येतात, ज्यामध्ये कोणतेच पोषण नसते. यामध्ये खूप जास्त कॅलरी असतात. साखर खाल्ल्यामुळे शरीराला फायदे आणि तोटे सुद्धा होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महिनाभर साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
दैनंदिन आहारात कायमच गोड पेय, बिस्किटे, मिठाई आणि पेस्ट्री आणि चहाचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला असंख्य तोटे सुद्धा होतात. त्यामुळे दैनंदिन वापरात कमीत कमी प्रमाणात साखर खावा. मिठाई किंवा जास्त गोड पदार्थ खाल्ल्यानंतर पोट लगेच भरते पण वारंवार तहान लागणे, वजन झपाट्याने वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. पण साखरेचे सेवन न केल्यामुळे इन्सुलिनची पातळी स्थिर राहते आणि शरीरात चरबी साठून राहण्याऐवजी शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. साखरेचा थेट परिणाम वजनावर दिसून येतो. महिनाभरात पूर्णपणे साखर खाणे बंद केल्यास ३ ते ४ किलो वजन सहज कमी होईल.
साखरेचे सेवन केल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. अनेक प्रकारचे जैविक व हार्मोनल बदल झाल्यानंतर शरीरावर नकारात्मक परिणाम दिसून येतात. त्यामुळे कमीत कमी साखरेचे सेवन करावे. साखरेचे सेवन केल्यामुळे शरीरातील थकवा कमी होऊन तात्काळ ऊर्जा मिळते पण कालांतराने शरीरावर गंभीर परिणाम दिसून येण्याची शक्यता असते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर स्वादुपिंडातून इन्सुलिन हार्मोन वाढण्याची शक्यता असते. याशिवाय मधुमेह होऊन संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. अतिसाखरेचे सेवन केल्यामुळे वजन वाढून शरीरात चरबीचे थर साचून राहतात. यामुळे लठ्ठपणा, हृदयविकार आणि रक्तदाब इत्यादी गंभीर आजारांचा धोका वाढतो.
साखरेच्या सेवनामुळे दात किडनी, दातांमध्ये वेदना जाणवणे यांसाख्या समस्या वाढून आरोग्य बिघडते. अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यास मेंदूवर परिणाम होतो. गोड पदार्थांचे सेवन केल्यानंतर काहीसे बरे वाटते, पण कालातंराने रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यानंतर थकवा, चिडचिड आणि अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे दैनंदिन आहारात योग्य प्रमाणात साखरेचे सेवन करावे. अतिसाखर खाल्ल्यास शरीरासोबतच त्वचेवर सुद्धा परिणाम दिसून येतात. त्वचेवर मुरुम, अकाली सुरकुत्या, पचनसंस्थेचे विकार आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवून आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.
Ans: शुगर म्हणजे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण, जे शरीरातील पेशींना ऊर्जा पुरवते.
Ans: जास्त साखर आणि कार्बोहायड्रेट्सचे सेवन.
Ans: वारंवार लघवी होणे. खूप तहान लागणे, तोंड कोरडे पडणे. सतत थकवा जाणवणे.