दारू पिण्याची खरी मज्जा सकाळी की रात्री? शरीरासाठी कोणता पर्याय ठरेल कमी हानिकारक?
अतिप्रमाणात दारूचे सेवन केल्यास शरीराला होणारी हानी?
कोणत्या वेळी बिअर पिणे योग्य?
दारू पिण्याची खरी मज्जा सकाळी की रात्री?
धावपळीची जीवनशैली, कामाचा तणाव, थकवा, अशक्तपणा, कौटुंबिक जबाबदाऱ्या इत्यादी अनेक गोष्टींमुळे प्रत्येकाला स्वतःसाठी वेळ हवा असतो. मित्रमैत्रिणींसोबत फिरायला गेल्यानंतर खूप एन्जॉय केले जाते. मित्र भेटल्यानंतर सगळ्यात कधी आणि कोणत्या वेळी भेटायचं? कोणत्या ब्रॅण्डची प्यायची? यावर अनेक चर्चा रंगतात. जगभरात असंख्य मद्यप्रेमी आहेत. काही आनंद व्यक्त करण्यासाठी पितात तर कधी मानसिक तणाव कमी करण्यासाठी दारू किंवा बिअर पितात. शरीरात वाढलेला थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी बिअर प्यायली जाते. पण कोणत्या वेळी बिअर किंवा दारू प्यावी? यात मोठा गोंधळ निर्माण होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दारू पिण्याची खरी मज्जा सकाळी की रात्री? शरीरासाठी कोणता पर्याय ठरेल कमी हानिकारक? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
सकाळच्या वेळी बिअर पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. यावेळी संपूर्ण शरीर डिटॉक्स आणि स्वच्छ होते. रिकाम्या पोटी शरीर स्वच्छ होण्याची प्रक्रिया सुरु असते. त्यामुळे सकाळच्या वेळी दारूचे सेवन केल्यास शरीर लगेच शोषून घेते आणि जास्त नशा चढते. तसेच सकाळी बिअर प्यायल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याची शक्यता असते. दिवसभर किंवा वारंवार बिअर किंवा दारूचे सेवन केल्यास शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवून चक्कर येण्याची शक्यता असते. सतत पिण्याची सवय लागल्यानंतर ती व्यसनात बदलते, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे गंभीर नुकसान होते.
रात्रीच्या वेळी कोणतीही दारू किंवा बिअर पिणे चांगले मानले जाते. रात्री बिअर प्यायल्यामुळे संपूर्ण दिवस सक्रिय राहतो आणि पचनसंस्था मजबूत राहते. पण रात्री झोपण्याआधी बिअरचे सेवन केल्यास झोपेची गुणवत्ता बिघडण्याची जास्त शक्यता असते. तसेच दारूचा हँगओव्हर दुसऱ्या दिवशी पर्यंत कायम टिकून राहतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी मर्यादित प्रमाणात दारू किंवा बिअरचे सेवन करावे.
सकाळी उठल्यानंतर सतत शिंका येतात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, नाकातून पाणी येणं होईल बंद
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी आणि दुपारच्या वेळी कोणत्याही बिअर किंवा दारूचे सेवन करणे शरीरासाठी अजिबात योग्य नाही. बिअरचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. नेहमी मर्यादित प्रमाणात मद्यपान करा आणि दारू रोजची सवय बनवू नका, असा सल्ला डॉक्टर कायमच देतात. कारण अतिप्रमाणात बिअर आणि दारूचे सेवन केल्यास लिव्हर आणि आतड्यांचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते.






