Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात नियमित चहा बिस्कीट खात असाल तर थांबा! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध

सकाळच्या नाश्त्यात नियमित चहासोबत बिस्कीट खाणे शरीरासाठी धोक्याचे ठरते. यामुळे वारंवार अपचनाच्या समस्या उद्भवतात. चला तर जाणून घेऊया चहा बिस्कीट खाण्याचे तोटे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 16, 2026 | 08:39 AM
सकाळच्या नाश्त्यात नियमित चहा बिस्कीट खात असाल तर थांबा! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध

सकाळच्या नाश्त्यात नियमित चहा बिस्कीट खात असाल तर थांबा! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध

Follow Us
Follow Us:

चहासोबत बिस्कीट खाण्याचे तोटे?
चहा पिण्याचे दुष्परिणाम?
चुकीचे कॉम्बिनेशन खाल्ल्यामुळे शरीराला कोणती हानी पोहचते?

सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाला चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. चहा कॉफीसोबत अनेकांना बिस्कीट किंवा टोस्ट खाण्याची सवय असते. बिस्कीट खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे अजिबात वाटत नाही. चॉकलेट बिस्कीट, क्रीम बिस्कीट, खारी बिस्कीट इत्यादी वेगवेगळी बिस्कीट खाल्ली जातात. भारतीय लोकांचा सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे बिस्कीट. भूक लागल्यानंतर सुद्धा चहासोबत बिस्कीट आवडीने खाल्ले जाते. पण मैदा असलेली बिस्कीट खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. लहान मुलांना सुद्धा चहा किंवा दुधासोबत बिस्कीट खाण्यास दिले जाते. पण नेहमी च बिस्कीट खाल्ल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. चहासोबत बिस्कीट खाल्ल्यास शरीरसंबंधित असंख्य समस्या उद्भवू लागतात. चला तर जाणून घेऊया बिस्कीट खाल्ल्यामुळे शरीरावर होणारे परिणाम.(फोटो सौजन्य – istock)

हृदयाची प्रत्येक नस होईल मुळापासून स्वच्छ! हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

चहा आणि बिस्कीट हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी अजिबात चांगले मानले जात नाही. आहार तज्ज्ञांच्या मते, नियमित बिस्कीट किंवा मैदा असलेले पदार्थ खाल्ल्यास शरीराला गंभीर आजारांची लागण होते. त्यामुळे रोज चहासोबत बिस्कीट खाऊ नये. बिस्किटांमध्ये मैदा,साखर आणि ट्रांस फॅट असतात. तसेच खूप जास्त कॅलरीज असलेले बिस्कीट खाल्ल्यामुळे शरीरात लठ्ठपणा वाढतो आणि झपाट्याने वजन वाढण्यास सुरुवात होते. या पदार्थांमध्ये खूप फायबर असते. त्यामुळे बिस्कीट खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठता किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. चहासोबत बिस्कीट खाल्ल्यानंतर सुरुवातीला पोट भरल्यासारखे वाटते, पण पुन्हा एकदा अर्धा तास होऊ गेल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा होते.

चहामध्ये साखर आणि कॅफिन असते. कॅफिन युक्त चहा सतत प्यायल्यास निद्रानाश, झोपेची गुणवत्ता खराब होणे, अपचन इत्यादी समस्या उद्भवतात. चहाचे अतिसेवन शरीराचे आतून नुकसान करते. सतत गोड बिस्कीट चहासोबत खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. यामुळे इंसुलिन रेजिस्ंटस किंवा टाईप २ मधुमेहाचा धोका वाढतो. ज्या लोकांना आधीपासूनच मधुमेहाचा त्रास असेल अशांनी चहा किंवा कॉफीसोबत बिस्किटांचे सेवन करणे टाळावे

बिस्किटमधील ट्रांसफॅट्स आणि रिफाईन तेल रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. रक्तात वाढलेल्या पिवळ्या कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. ज्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो.हृदयाच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर चसोबत बिस्कीट खाऊ नये. चुकीचे कॉम्बिनेशन वारंवार खाल्ल्यामुळे आरोग्यावर परिणाम होतात.

Liver Day 2026: यकृत निरोगी राहण्यासाठी फॉलो करा ‘या’ सवयी, कधीच होणार नाही गंभीर आजारांची लागण

बिस्कीट खाल्ल्यामुळे केवळ हृद्यासंबंधितच नाहीतर पचनक्रिया सुद्धा बिघडण्याची जास्त शक्यता असते. पोटात गॅस तयार होणे, ऍसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या उद्भवू शकतात. तर काहीवेळा दातांमध्ये वेदना, चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे बिस्कीट खाणे टाळावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: चहा-बिस्कीट खाल्ल्याने कोणते दुष्परिणाम होऊ शकतात?

    Ans: वजन वाढणे, अॅसिडिटी, पचनाचे त्रास, थकवा आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे यासारखे परिणाम दिसू शकतात.

  • Que: रोज सकाळी चहा-बिस्कीट खाणे का टाळावे?

    Ans: चहा-बिस्कीटमध्ये पोषणमूल्य कमी असते आणि साखर व मैदा जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळत नाहीत.

  • Que: चहा पिण्याची योग्य वेळ कोणती?

    Ans: नाश्त्यानंतर किंवा हलका आहार घेतल्यानंतर चहा पिणे अधिक योग्य ठरते.

Web Title: If you regularly have tea and biscuits for breakfast stop now it could seriously harm your health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 08:39 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Improves digestion
  • side effect

संबंधित बातम्या

Knee Pain: खाली बसताना किंवा उठताना गुडघ्यांमधून आवाज येतो? तरुण वयात गुडघ्यांमधील ग्रीस कमी होण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी
1

Knee Pain: खाली बसताना किंवा उठताना गुडघ्यांमधून आवाज येतो? तरुण वयात गुडघ्यांमधील ग्रीस कमी होण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी

जेवताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढतो किडनी स्टोनचा धोका, आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास लघवीवाटे वाहून जाईल मुतखडा
2

जेवताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढतो किडनी स्टोनचा धोका, आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास लघवीवाटे वाहून जाईल मुतखडा

World Arthritis Day: सांधेदुखीचा त्रास कशामुळे होतो? जाणून घ्या यामागील प्रमुख कारणे, लक्षणे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा
3

World Arthritis Day: सांधेदुखीचा त्रास कशामुळे होतो? जाणून घ्या यामागील प्रमुख कारणे, लक्षणे आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

Weight Loss: पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने कमी! भूक लागल्यानंतर ‘या’ पदार्थांचे आवर्जून करा सेवन, राहाल कायमच फीट
4

Weight Loss: पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने कमी! भूक लागल्यानंतर ‘या’ पदार्थांचे आवर्जून करा सेवन, राहाल कायमच फीट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.