कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा आलुबुखारचा समावेश, शरीराला मिळेल आवश्यक पोषण
आलुबुखारमध्ये विटामिन सी आणि आवश्यक खनिजे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. आंबट गोड चवीचे लालचुकूट फळ शरीरासाठी आणि त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे.
यामध्ये फायबर आणि सॉर्बिटॉलचे प्रमाण खूप जास्त असते. जुनाट बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात आलुबुखार खावा.
आलुबुखारमध्ये विटामिन के,पोटॅशियम आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक हाडे मजबूत करण्यास मदत करते. ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी करण्यासाठी आलुबुखार फायदेशीर आहे.
कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आलुबुखार खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयाच्या आजाराची लागण होत नाही.
ग्लाइसेमिक इंडेक्स असलेल्या फळाचे सेवन करणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुणकारी ठरते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.