3d render
वास्तुशास्त्रानुसार सर्व ठिकाणांना आणि सर्व दिशांचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात आणि त्याचा आपल्या दैनंदिन जिवनावर प्रभाव पडत असतो. भिंतीवर सकारात्मक चित्र लावावे. तुमच्या ऑफिसमध्ये किंवा घरात तुमच्या बसण्याच्या ठिकाणाच्या समोर रिकामी भिंत असेल तर त्या भिंतीवर एखादे सकारात्मक उर्जा देणारे चित्र लावा. जे पाहून तुमच्या मनात सकारात्मक विचार येतात. असे केल्याने तुमचे मन आणि आरोग्य दोन्ही गोष्टी उत्तम राहील त्यामुळे तुम्ही आपोआप सकारात्मक विचार कराल.
वास्तुशास्त्रात सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला शारीरिक मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वास्तुशास्रानुसार रिकाम्या भिंतीकडे सतत तोंड करून बससल्यास तुम्ही अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरले जाऊ शकता. वास्तुशास्त्रानुसार रिकाम्या भिंतीकडे सतत तोंड करून बसल्याने मनातील नकारात्मकता वाढते.
‘रिकामे मन हे सैतानाचे घर आहे’ अशी म्हण तुम्ही ऐकली असेल. जर एखादी व्यक्ती दिवसभर रिकामी बसलेली असेल आणि कोणतेही काम करत नसेल तर त्याच्या मनात अनेक वाईट गोष्टी येऊ लागतात. अगदी त्याचप्रमाणे रिकाम्या भिंतीकडे सतत तोंड करून बसल्यानेही आपोआप तुमच्या मनातील नकारात्मकता वाढते. ज्याचा परिणाम तुमच्या मेंदूवर होतो आणि मग व्यक्तीला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.






