केस होतील चमकदार आणि सॉफ्ट! 'या' पद्धतीने केसांवर लावा कोरफड जेल, निर्जीव केसांना मिळेल पोषण
सर्वच महिलांसह पुरुषांना आपले केस चमकदार आणि मजबूत हवे असतात. केसांच्या निरोगी वाढीसाठी सतत काहींना काही केले जाते. कधी बाजारात उपलब्ध असलेला महागडा शाम्पू लावला जातो तर कधी केसांची काळजी घेण्यासाठी हेअर मास्क, हेअर केअर प्रॉडक्ट लावून केस चमकदार आणि सुंदर केले जातात. पण वातावरणात होणारा बदल, आहारात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता, पाण्याची कमतरता, चुकीचे हेअर केअर प्रॉडक्ट इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम केसांच्या वाढीवर लगेच दिसून येतो. केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केसांची मूळ कमकुवत होणे, केस तुटणे इत्यादी असंख्य समस्या उद्भवतात. आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम केसांच्या वाढीवर लगेच दिसून येतो. त्यामुळे केसांची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला केसांची हरवलेली चमक पुन्हा परत मिळवण्यासाठी केसांवर कोरफड जेल कसे लावावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
केस स्वच्छ करण्यासाठी वारंवारण वेगवेगळ्या शाम्पू आणि कंडिशनरचा वापर केला जातो. पण सतत केमिकल युक्त शाम्पू लावल्यामुळे केस मुलायम होण्याऐवजी झाडूसारखे कोरडे आणि रखरखीत होऊन जातात. खराब झालेले केस सुधारण्यासाठी कोणत्याही केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर न करता नैसर्गिक आणि घरगुती उपाय करावेत. यामुळे केसांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि केस चमकदार होतात. कोरफड जेल केस अतिशय मुलायम आणि सॉफ्ट करते. यामध्ये असलेले गुणकारी घटक केसांच्या मुळांना भरपूर पोषण देतात आणि केस चमकदार करतात. याशिवाय कोरफड जेल लावल्यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होते. त्यामुळे या पद्धतीने केसांवर आठवड्यातून दोनदा कोरफड जेल लावावे.
कोरफडचा गर केसांसाठी वरदान मानला जातो. यामध्ये असलेले गुणकारी घटक केस मुलायम आणि सॉफ्ट करतात. याशिवाय केसांमधील हायड्रेशन कायम टिकवून ठेवण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. कोरफडचे जाड गर असलेले पान घ्या. त्यानंतर त्यातील गर काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. तयार केलेली पेस्ट केसांवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होईल. १ तास ठेवल्यानंतर केस अतिशय सौम्य शाम्पूने केस स्वच्छ करून घ्या. केसगळती आणि कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी कोरफड जेल लावावे. यामुळे केसांच्या बऱ्याच समस्या कमी होण्यास मदत होईल.
आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केसांवर तुम्ही कोरफड जेल लावू शकता. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक केसांना भरपूर पोषण देतात. केसांच्या वाढीसाठी प्रभावी ठरतात. केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी कोरफड जेलमध्ये लिंबाचा रस आणि खोबऱ्याचे तेल मिक्स करून केसांवर लावल्यास टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी होईल आणि केस चमकदार दिसतील.






