कोणत्याही क्षणी येईल Heart attack! शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या सविस्तर
हार्ट अटॅक येण्याची कारणे?
हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येणारी लक्षणे?
हृद्यविकारापासून बचाव कसा करावा?
जगभरात हार्ट अटॅक येऊन मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जीवनशैलीत होणारे बदल, आहारात होणारा बदल, अपुरी झोप, जंक फूडचे, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. हार्ट अटॅक केवळ वयस्कर लोकांचं नाहीतर तरुण वयातील मुलामुलींना सुद्धा हार्ट अटॅक येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक आल्यामुळे काहींचा मृत्यू देखील होतो. डॉक्टरांच्या मते, कार्डियाक अरेस्ट किंवा हार्ट अॅटॅक कधीच अचानक येत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. ज्यामुळे आरोग्य बिघडते. हार्ट अटॅक हा सायलेंट किलर आजार आहे. आज आम्ही तुम्हाला हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
Thyroid झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल, वेळीच धोका ओळखून करा योग्य उपचार
हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीरात असंख्य बदल दिसून येतात. दिवस संपताना पायांच्या तळव्यांना किंवा घोट्याजवळ सूज येते. शरीरात फ्लुइड साचून राहिल्यामुळे हार्ट अटॅक किंवा किडनीच्या समस्या उद्भवतात. हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर हृदय रक्त योग्य प्रकारे पंप करू शकत नाही, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. रक्तप्रवाह कमी झाल्यानंतर द्रव पायांपर्यंत नीट पोहोचत नाही. टिश्यूमध्ये द्रव साचून राहिल्यामुळे पायांना सूज येते.
हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी हृदयाची धडधड खूप जास्त वेगाने वाढते. याशिवाय अनियमित ठोके जाणवू लागतात. बऱ्याचदा अॅरिदमियाची लक्षणे जाणवू लागल्यानंतर हृदयाची धडधड सामान्य लयीत राहत नाही. रक्त पंप करताना हृदयाला जास्तीची मेहनत घ्यावी लागते. तसेच डॉक्टरांच्या मते, फिब्रिलेशन झाल्यामुळे स्ट्रोक आणि हार्ट फेल्युअर इत्यादी गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
छातीतील दुखणे हात, जबडा, मान किंवा पाठीपर्यंत पसरल्यानंतर ती सामान्य लक्षणे नसून हार्ट अटॅक येण्याआधी अशी लक्षणे दिसू लागतात. या वेदना काहीवेळा अतिशय तीव्र होतात. काहीवेळा छातीमध्ये वेदना शारीरिक हालचाल न केल्यामुळे आणि मानसिक तणाव वाढल्यामुळे सुद्धा होतात. त्यामुळे शरीरात दिसून येणारी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.
Diabetes रूग्णांसाठी बटाटा आणि रताळं ठरतं विष? काय आहे तथ्य
हार्ट अटॅक येऊ नये म्हणून शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. शारीरिक हालचाली, नियमित व्यायाम, ध्यान आणि प्राणायाम केल्यामुळे शरीर कायमच हेल्दी राहण्यास मदत होते. शरीरात निर्माण झालेला शारीरिक हालचालींचा अभाव आरोग्यासाठी संकट ठरतो. धूम्रपान व मद्यपान टाळणे, आणि रक्तातील साखर व कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणे यांसारख्या महत्वपूर्ण गोष्टींची काळजी घेतल्यास हार्ट अटॅकमुळे शरीराचे नुकसान होणार होणार नाही.
Ans: छातीच्या मध्यभागी कडक होणे, दाब जाणवणे किंवा जळजळ होणे.
Ans: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे असा झटका, ज्याची लक्षणे खूप सौम्य असतात किंवा छातीत वेदना होत नाहीत.
Ans: छातीत, खांद्यात किंवा जबड्यात वारंवार वेदना होणे.






