
थंडीच्या कडाक्यात सुकामेव्याला ऊबदार' मागणी!
राज्यात थंडीचा कडाका वाढू लागताच आरोग्याप्रति जागरूक असलेल्या नागरिकांची पावले आता मार्केट यार्डातील सुकामेव्याच्या दुकानांकडे वळू लागली आहेत. शरीरात नैसर्गिक उष्णता निर्माण करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक टिकवण्यासाठी हिवाळ्यात शक्ती सुकामेव्याला विशेष पसंती दिली जाते. दिलासादायक वाब म्हणजे, यंदा जागतिक आणि देशांतर्गत उत्पादन चांगले झाल्याने सुकामेव्याचे दर स्थिर असून काही वस्तूंमध्ये तर मोठी घट पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या तुलनेत सध्या सुकामेव्याचे दर नियंत्रणात आहेत. केंद्र सरकारने काही वस्तूंवरील जीएसटी उत्पादन समाधानकारक झाल्याने दरवाढीची शक्यता तूर्तास मावळली आहे. स्वदेशी मालाचा मुबलक पुरवठा बाजारात उपलब्ध असल्याने सर्वसामान्यांना सुकामेव्याची खरेदी करणे आता अधिक सुलभ झाले आहे. (फोटो सौजन्य – istock)
देव समजला जाणारा डॉक्टरच पडतोय सर्वाधिक आजारी! काय म्हणतंय संशोधन? जाणून घ्या
हिवाळ्यात शरीराला अधिक कॅलरी आणि पोषक तत्त्वांची गरज असते. सुकामेव्याच्या सेवनाने शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक मिळतात. विशेषतः थंडीच्या दिवसांत घरोघरी बनवले जाणारे डिंक आणि मेथीचे लाडू यासाठी खोबरे, डिक आणि खारीक-बदाम यांना मोठी मागणी असते. सध्या बाजारात डिक २८० रुपये किलो, तर खोबरे २५० ते ३२० रुपये किलो दराने उपलब्ध आहे.पिंपरी-चिंचवडच्या बाजारात सुकामेव्याची ‘रेलचेल’ असून, पोषक आहाराकडे वळणाऱ्या ग्राहकांसाठी ही खरेदीची सुवर्णसंधी आहे. येत्या काळातही मोठी दरवाढ होण्याची वातावरण आहे. शक्यता नसल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातवरण आहे.
वर्षाच्या बाराही महिने शरीराला पोषण देण्यासाठी आहारात वेगवेगळ्या फळे आणि भाज्यांसोबतच सुकामेव्याचे सुद्धा सेवन करावे. सुका मेवा खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहते, हाडे मजबूत होतात, हृदय निरोगी राहते आणि त्वचेवरील चमक वाढण्यास मदत होते. सुका मेवामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, प्रथिने आणि आवश्यक फॅटी ॲसिडस् हाडांचे आरोग्य निरोगी ठेवतात.
थंडीच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारांची लागण सहज होते. या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी सुका मेवा खावा. सुकामेव्यामध्ये असलेले फायबर आणि प्रथिनांमुळे पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. सकाळी उठल्यानंतर नियमित ४ ते ५ भिजवलेले बदाम खावे. यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. याशिवाय बदामामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.