Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात आजारांपासून होईल शरीराचे रक्षण, सकाळच्या नाश्त्यात प्या हेल्दी टेस्टी Garlic Vegetable Soup

थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात उष्णता कायम टिकवून ठेवण्यासाठी लसूण खावी. मात्र लसूण खायला अनेकांना आवडत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये गार्लिक व्हेजिटेबल सूप बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 08, 2025 | 03:00 PM
हिवाळ्यात आजारांपासून होईल शरीराचे रक्षण, सकाळच्या नाश्त्यात प्या हेल्दी टेस्टी Garlic Vegetable Soup

हिवाळ्यात आजारांपासून होईल शरीराचे रक्षण, सकाळच्या नाश्त्यात प्या हेल्दी टेस्टी Garlic Vegetable Soup

Follow Us
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णतेची आवश्यक असते. कारण वातावरणात असलेल्या गारव्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सर्दी, खोकला, ताप इत्यादी साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. याशिवाय वारंवार आजारी पडल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्यासोबतच शरीरात कायमच थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. अशावेळी कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती पदार्थांचे सेवन करून शरीराची ऊर्जा वाढवावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये गार्लिक व्हेजिटेबल सूप बनवण्याची सोपी रेसिपी रेसिपी सांगणार आहोत. लसूण खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात, सर्दी खोकल्यापासून सुटका होते आणि घशात वाढलेली खवखव कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया गार्लिक व्हेजिटेबल सूप बनवण्याची कृती. (फोटो सौजन्य – istock)

जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा काठीयावाडी लसूण चटणी, नोट करून घ्या झणझणीत रेसिपी

साहित्य:

  • लसूण
  • ऑलिव्ह तेल
  • कांदा
  • आलं
  • गाजर
  • शिमला मिरची
  • ब्रोकोली
  • मटार
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
  • कोथिंबीर
कडाक्याच्या थंडीत जेवणासोबत खाण्यासाठी झटपट बनवा मिक्स भाज्यांचे लोणचं, आंबटगोड चवीचा पारंपरिक पदार्थ

कृती:

  • गार्लिक व्हेजिटेबल सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. त्यानंतर भाज्या पाण्याने धुवून घ्या.
  • कढईमध्ये ऑलिव्ह तेल घालून गरम करून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली लसूण आणि आलं घालून लाल होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून व्यवस्थित शिजवून घ्या. त्यानंतर त्यात ब्रोकोली, गाजर, शिमला मिरची आणि इतर भाज्या, चवीनुसार मीठ घालून हलकीशी वाफ काढा.
  • भाज्या शिजल्यानंतर त्यात ३ ते ४ वाट्या कोमट पाणी घालून सूपला उकळी येण्यासाठी ठेवा.
  • सूपला एक उकळी आल्यानंतर त्यात काळीमिरी पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. सगळ्यात शेवटी सूप तयार झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले गार्लिक व्हेजिटेबल सूप. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यात प्यावा.

Web Title: In winter the body will be protected from diseases drink healthy tasty garlic vegetable soup in the morning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Soup Recipes

संबंधित बातम्या

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव
1

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव

शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश! गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या जांभळांपासून बनवा थंडगार सरबत, मधुमेह राहील नियंत्रणात
2

शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश! गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या जांभळांपासून बनवा थंडगार सरबत, मधुमेह राहील नियंत्रणात

Chilli Potato: फक्त १५ मिनिटांत बनवा रेस्टॉरंटसारखे क्रिस्पी चिली पोटॅटो; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल, वाचा सोपी रेसिपी
3

Chilli Potato: फक्त १५ मिनिटांत बनवा रेस्टॉरंटसारखे क्रिस्पी चिली पोटॅटो; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल, वाचा सोपी रेसिपी

पारंपरिक चवीचा खजिना! घरच्या घरी झटपट बनवा आंबटगोड चवीची चिंच चटणी, जेवणाची वाढेल दुप्पट चव
4

पारंपरिक चवीचा खजिना! घरच्या घरी झटपट बनवा आंबटगोड चवीची चिंच चटणी, जेवणाची वाढेल दुप्पट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.