लहान मुलांच्या आहारात करा कॅल्शियम युक्त पदार्थांचा समावेश
लहान मुलांच्या मजबूत आरोग्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, ड्रायफ्रूट, फळे इत्यादी अनेक पौष्टिक गोष्टी खायला दिल्या जातात. पण लहान मुलाचे सर्व पदार्थ खाणे टाळतात. मुलांच्या सुदृढ आणि निरोगी वाढीसाठी मुलांना पौष्टीक आहार देणे फार गरजेचे आहे. हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी शरीरात कॅल्शियम असणे आवश्यक आहे. कॅल्शियमचं नसेल तर मुलांची वाढ व्यवस्थित होत नाही. कॅल्शियम कमी झाल्यानंतर त्याचे परिणाम लगेच आरोग्यावर दिसून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या मजबूत हाडांसाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याबद्दल सांगणार आहोत. हे पदार्थ खाल्ल्याने मुलांच्या शरीरात कॅल्शियम वाढू लागेल.(फोटो सौजन्य-istock)
लहान मुलांच्या आहारात करा कॅल्शियम युक्त पदार्थांचा समावेश
दूध आणि दह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम आढळून येते. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यसंबंधित समस्या जाणवू लागतात. त्यामुळे रोजच्या आहारात एक ग्लास दूध आणि अर्धा वाटी दह्याचा समावेश करावा. तसेच तुम्ही आहारात पनीर करी, मिल्क शेक आणि दही रायता सुद्धा बनवून खाऊ शकता. हे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरातील कॅल्शियम वाढेल.
हे देखील वाचा: व्यायाम डाईट करून वजन कमी होत नाही? मग फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
लहान मुलांच्या आहारात करा कॅल्शियम युक्त पदार्थांचा समावेश
आरोग्यासाठी बदाम अतिशय फायदेशीर आहेत. बदाम खाल्ल्याने शरीरात कॅल्शियम वाढण्यास मदत होते. तसेच बदाममध्ये अनेक पोषक घटक आढळतात. रोज सकाळी उठल्यानंतर 5 ते 6 भिजवलेले बदाम किंवा बदाम शेक प्यायल्याने महिन्याभरात शरीरातील कमी झालेले कॅल्शियम वाढेल.
लहान मुलांच्या आहारात करा कॅल्शियम युक्त पदार्थांचा समावेश
कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. त्यामध्ये पालक, मेथी, लाल माठ, बीन्स, ब्रोकोली इत्यादी भाज्या खाव्यात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्वे आणि कॅल्शियम, फायबर आढळून येते.
लहान मुलांच्या आहारात करा कॅल्शियम युक्त पदार्थांचा समावेश
सोयाबीनमध्ये भरपूर प्रथिने आणि कॅल्शियम असते, त्यामुळे आहारात सोयाबीनचा समावेश करावा. हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि शरीरातील कमी झालेले कॅल्शियम वाढवण्यासाठी सोयाबीन खावेत. तसेच तुम्ही आहारात सोया मिल्क आणि टोफूचा सुद्धा समावेश करू शकता.
हे देखील वाचा: महिलांमध्ये का वाढतोय हृदयविकाराचा झटका? जाणून घ्या लक्षणे
लहान मुलांच्या आहारात करा कॅल्शियम युक्त पदार्थांचा समावेश
पालकमध्ये भरपूर कॅल्शियम असते. कॅल्शियम कमी झाल्यामुळे शरीरावर आलेले डाग घालवण्यासाठी आहारात पालकचा समावेश करावा. पालक स्मूदी किंवा पालक ज्युस सुद्धा तुम्ही बनवून पिऊ शकता. हे पदार्थ लहान मुलांना खूप आवडतील.