महिलांमध्ये दिसून येणारी हृदयविकाराची लक्षणे
घरातील स्त्रियांवर कामाची जबादारी असल्यामुळे त्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. कधीही जेवणे, सतत काम करत राहणे, अपुरी झोप इत्यादींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे छोटे आजारांचे रूपांतर मोठ्या आजारांमध्ये होते. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. कामाचा वाढलेला ताण आणि कुटुंबाची जबादारी या सगळ्यामध्ये महिला पूर्णपणे गुंतून गेल्या आहेत. पण मागील काही वर्षांपासून महिलांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे. हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे दिसू लागल्यानंतर सुद्धा लक्ष देईल जात नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला महिलांमध्ये हृद्यविकाराचा झटका येण्यापूर्वी कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
छातीमध्ये दुखणे हे हृदयविकाराचा झटका येण्यामागचे प्रमुख लक्षण आहे. पण सहसा याकडे दुर्लक्ष केले जाते. छातीमध्ये दुखी लागल्यानंतर छातीत दाब, घट्टपणा किंवा दाबल्यासारखे वाटू लागते. अशी अस्वस्थता जास्त काळ राहिल्यामुळे हृद्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकते.
हे देखील वाचा: अचानक एखाद्या व्यक्तीस Heart Attack आल्यास काय करावे? ‘हा’ उपाय वाचवेल प्राण
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरातील इतर भागांमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. खांदे, हात, पाठ, मान, जबडा किंवा पोटात अस्वस्थता जाणवणे इत्यादी समस्या जाणवू लागतात. शारीरिक हालचाली केल्यानंतर अंग दुखणे.
महिलांमध्ये दिसून येणारी हृदयविकाराची लक्षणे
अस्पष्ट घाम येणे हे सुद्धा हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण आहे. तसेच सतत थकवा जाणवू लागल्यानंतर श्वास घेण्यास सुद्धा त्रास होऊ लागतो. हृदयविकाराचा झटका येण्याच्या आठवडाभर आधी ही सर्व लक्षणे जाणवू लागतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा: तुम्ही Heart Attack च्या विळख्यातून किती वेळा वाचू शकता? लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
डोकं हलकं वाटणे, मळमळ होणे, कधीकधी उलट्या होणे इत्यादी लक्षणे जाणवू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध उपचार घ्यावे. मेंदू आणि पचनसंस्थेला रक्तपुरवठा कमी झाल्यानंतर सुद्धा ही लक्षणे जाणवू लागतात.